पाणीटंचाई आराखडा बैठकीवरून राजकीय खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:44 AM2017-11-12T00:44:46+5:302017-11-12T00:44:51+5:30
कंधार पंचायत समिती परिसरात जाने २०१८ ते जून २०१८ या कालावधीचा ग्रामीण पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा बैठक ११ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. बैठक राजशिष्टाचाराप्रमाणे न घेता सभापती- उपसभापतींसह सत्ताधाºयांना डावलल्याचा आरोप करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कंधार : कंधार पंचायत समिती परिसरात जाने २०१८ ते जून २०१८ या कालावधीचा ग्रामीण पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा बैठक ११ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. बैठक राजशिष्टाचाराप्रमाणे न घेता सभापती- उपसभापतींसह सत्ताधाºयांना डावलल्याचा आरोप करण्यात आला. बैठकीवरुन आलेल्या ग्रामपंचायत सरपंच- उपसरपंच, सदस्य अन् अधिकारी कर्मचाºयांत खमंग चर्चेने उधाण आले होते.
आ. प्रताप पा. चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली व आ.डॉ. तुषार राठोड यांच्यासह अध्यक्षतेखाली आणि सभापती सत्यभामा देवकांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जि. प. सदस्य, पं. स. सदस्यांच्या, संबंधित अधिकारी यांना आमंत्रित करण्यात आले होते.
व्यासपीठावर लोकप्रतिनिधी बैठकीस आणि मोजकेच अधिकारी यांची आसनव्यवस्था केली. सकाळी १० वाजताची बैठक उशिरा सुरू झाली आणि वादळी ठरली. असेच एकंदरीत चित्र होते. बैठकीचा राजशिष्टाचार बाजूला करत व्यासपीठावर राजकीय नेते- कार्यकर्ते याची मोठी भाऊ गर्दी झाली आणि बैठकीला प्रारंभ केला. सभापती- उपसभापतीसह पं. स. मधील सत्ताधारी गट व्यासपीठावरील राजकीय गर्दीमुळे बैठकीकडे पाठ फिरविली.
आम्हाला डावलून ऐनवेळी विश्वासघात केला असल्याचा आरोप पं.स. सत्ताधारी गटाने पत्रकार परिषदेत केला. पत्रपरिषदेला सभापती सत्यभामा देवकांबळे, उपसभापती भीमराव जायेभाये, जि.प. सदस्या संध्या धोंडगे, अॅड. विजय धोंडगे, पं. स. सदस्य शिवा नरंगले, उत्तम चव्हाण, दिगंबर वडजे, लक्ष्मीबाई घोरबांड, सत्यनारायण मानसपुुरे यांची उपस्थिती होती. यावेळी आम्ही आराखडा तयार केला आहे. पुन्हा सूचना मागविण्यासाठी स्वतंत्र बैठक घेणार असे जाहीर केले.