राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक नेतृत्व हरपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:04 AM2021-06-19T04:04:07+5:302021-06-19T04:04:07+5:30
उच्च न्यायालयाचे नामांकित वकील व सक्रिय सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यकर्ते, फर्डे वक्ते, मराठवाडा जनता विकास परिषदेचे दमदार नेतृत्व ...
उच्च न्यायालयाचे नामांकित वकील व सक्रिय सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यकर्ते, फर्डे वक्ते, मराठवाडा जनता विकास परिषदेचे दमदार नेतृत्व करणारे ॲड. प्रदीप देशमुख यांच्या जाण्याने राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक नेतृत्व हरपले आहे. मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी परखड भूमिका घेत न्यालयीन लढ़ा त्यांनी दिला. यांचे अचानक निधन चटका लावणारे असून सार्वजनिक जीवनातील एक चैतन्यमय मनोहर माणूस हरपला आहे. आम्ही समवयस्क, पुण्यात पत्रकारिता केलेले, त्यांनी लोकसभा सचिवालयातही काम केलं होते. पण ते अन् माणसांच्या आकर्षणानं मुंबईतून औरंगाबादला आले. मराठवाडा विकास आंदोलनात ते सक्रिय होते. बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांचे ते आवडते शिष्य होते. विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे यांचे राजकारणापलीकडचे स्नेही होते. व्यापकवृत्तीचे व समाजातील सर्व थरात मित्र जपणारे ॲड. देशमुख यांची अचानक एक्झिट मनाला यातना देणारी आहे.
प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे
माजी कुलगुरू, एमजीएम