राजकारण्यांनो तुम्ही तज्ज्ञ नाहीत; मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 01:54 PM2021-05-25T13:54:38+5:302021-05-25T13:54:54+5:30
उगीच लोकांच्या जीवाशी खेळू नका, अशा शब्दात खंडपीठाने राजकारण्यांना बजावले.
औरंगाबाद : पीएम केअर फंडातून मिळालेल्या १५० व्हेंटिलेटर्सपैकी बहुतांश नादुरुस्त असल्याबाबतच्या १२ मे पासूनच्या लोकमतच्या बातम्यांची खंडपीठाने दखल घेऊन केंद्र शासनाच्या वकिलांना सविस्तर माहिती घेऊन शुक्रवारी सादर करण्याचे निर्देश आज मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाने दिले.
तसेच राजकारण्यांनो व्हेंटीलेटर्सच्या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नका, तुम्ही तज्ज्ञ नाहीत, उगीच लोकांच्या जीवाशी खेळू नका, अशा शब्दात खंडपीठाने राजकारण्यांना बजावले.