लिंबोटीवरुन मन्याड खो-याचे राजकारण तापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:42 AM2017-11-12T00:42:18+5:302017-11-12T00:42:21+5:30
लोहा-कंधार तालुक्यात यंदा सरासरीच्या निम्माच पाऊस झाला़ त्यामुळे सलग चार वर्षे दुष्काळाचे चटके सहन करणाºया शेतकºयांचे तोंडचे पाणी पळाले आहे़ त्यात लिंबोटी प्रकल्प शंभर टक्के भरलेला आहे़ रबी हंगामही काही दिवसांवर येऊन ठेपला आहे़ त्यामुळे लिंबोटीच्या पाण्याचे सिंचनासाठी आवर्तन सोडण्यावरुन सध्या आ़ प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी आ़शंकरअण्णा धोंडगे यांच्यात द्वंद पेटले आहे़ त्यामुळे मन्याड खोºयाचे राजकारण लिंबोटीच्या पाण्यावरुन चांगलेच तापले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
लोहा/नांदेड:लोहा-कंधार तालुक्यात यंदा सरासरीच्या निम्माच पाऊस झाला़ त्यामुळे सलग चार वर्षे दुष्काळाचे चटके सहन करणाºया शेतकºयांचे तोंडचे पाणी पळाले आहे़ त्यात लिंबोटी प्रकल्प शंभर टक्के भरलेला आहे़ रबी हंगामही काही दिवसांवर येऊन ठेपला आहे़ त्यामुळे लिंबोटीच्या पाण्याचे सिंचनासाठी आवर्तन सोडण्यावरुन सध्या आ़ प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी आ़शंकरअण्णा धोंडगे यांच्यात द्वंद पेटले आहे़ त्यामुळे मन्याड खोºयाचे राजकारण लिंबोटीच्या पाण्यावरुन चांगलेच तापले आहे़
माजी आ़धोंडगे यांनी लिंबोटीचे पाणी सोडण्यासाठी लोहा येथे लाभक्षेत्रातील शेतकºयांची बैठक घेवून पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले होते़, परंतु त्यानंतरही पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले नाही़ त्यामुळे शुक्रवारी धोंडगे यांनी अधीक्षक अभियंत्याच्या कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन केले होते़ त्यानंतर शनिवारी लोहा येथे शेतकºयांची बैठकही त्यांनी घेतली़ त्यानंतर पत्रपरिषदेत शंकरअण्णा धोंडगे म्हणाले, यंदा पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी झाले़ त्यामुळे पिकांना उत्पादन मिळाले नाही़ पिकांची आणेवारी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष शेतात जाऊन न काढता कागदोपत्री करतात. सरकारने पुरेशा कोळशाअभावी वीजनिर्मितीला बाधा येत असल्याचे सांगितले़ त्यानंतर थकबाकीचे कारण पुढे करीत कृषी पंपाची वीजजोडणी ऐन हंगामाच्या तोंडावर तोडली़ खरीप गेले, रबीही जाणार मग खाणार काय? अशा विवंचनेत शेतकरी सापडला आहे़ त्यामुळे येत्या १३ नोव्हेंबर रोजी लिंबोटी धरणावर गेट खाली करो आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला़
यावेळी दत्ता पाटील, संजय पाटील कºहाळे, बाबासाहेब देशमुख, प्रल्हाद फाजगे यांची उपस्थिती होती़
तर याबाबत आ़ प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले, आमदार या नात्याने ३० आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यांची प्रत्यक्ष भेट घेवून अप्पर मनार लिंबोटी धरण व बारुळ धरणातून रबी पिकाला पाणी सोडण्यासंदर्भात चर्चा केली़, परंतु या प्रश्नावर फुकटचे श्रेय लाटण्यासाठी काही मंडळी पाटबंधारे विभागात जावून ठिय्या आंदोलनाची नौटंकी करीत आहेत. आमदार या नात्याने शेतकºयांच्या प्रश्नांवर जागरुकपणे शासनस्तरावर व जिल्हा प्रशासनाला निवेदने देवून तो सोडविण्यासाठी आपण सक्षम आहोत, असेही आ.चिखलीकर म्हणाले़
१६ नोव्हेंबर रोजी रबी पिकाला लिंबोटी धरणातून पाणी सोडण्याच्या संदर्भात बैठकीचे आयोजन केल्याची माहिती मिळाल्यानंतर ही नौटंकी सुरु झाली़ जनतेनी त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली होती, त्यावेळी त्यांनी विधानसभेत किंवा इतर कुठेही शेतकºयांच्या हितासाठी तोंड उघडले नाही.
राजकीय अस्तित्व संपलेल्यांनी ठिय्या आंदोलनाच्या नौटंकीने काही फरक पडणार नाही, असा टोलाही ्रआ़ प्रताप पाटील चिखलीकर यांनी लगावला.