वाळूज महानगरातील २१ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:05 AM2021-01-15T04:05:27+5:302021-01-15T04:05:27+5:30
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरातील ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि.१५) मतदान होणार आहे. एमआयडीसी व वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १३८ ...
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरातील ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि.१५) मतदान होणार आहे. एमआयडीसी व वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १३८ बूथवर मतदान होणार असून, यात १७ संवेदनशील बूथचा समावेश आहे.
या परिसरातील सक्षम म्हणून गणल्या जाणाऱ्या रांजणगाव, जोगेश्वरी, वाळूज, पंढरपूर, अंबेलोहळ, नारायणपूर आदी ठिकाणी चुरशीच्या लढती होत आहेत. यंदा प्रथमच सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने पॅनलप्रमुखांची चांगलीच गोची झाली होती.
वाळूज महानगर परिसरात औरंगाबाद व गंगापूर तालुक्यातील २१ ग्रामपंचायती आहेत. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी १३८ बूथवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. यात अंबेलोहळ, तीसगाव व पंढरपुरातील १७ बूथ संवेदनशील असून, या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात आहे. वाळूज एमआयडीसी हद्दीत निवडणूक प्रकिया शांततेत पार पडावी, यासाठी एक पोलीस उपायुक्त, सहायक उपायुक्त, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक १७, पोलीस उपनिरीक्षक व २६० पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले. वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ पोलीस अधिकारी व १८८ पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी सांगितले.
रांजणगावात सर्वाधिक २७ हजार २७२ मतदार
रांजणगावात सर्वाधिक २७ हजार २७२ मतदार असून, त्याखालोखाल वाळूजला १८ हजार ९० मतदार आहे. जोगेश्वरी (१४ हजार ५०८), अंबेलोहळ (३ हजार ५६७), एकलहेरा (१ हजार ७१४), वडगाव-रामपुरी (१ हजार ८२३), लांझी (१ हजार ९२), कासोडा (१ हजार ६८३) मतदार आहेत.
फोटो ओळ-पंढरपुरात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पथसंचलन केले.
---------------------------------