छत्रपती संभाजीनगरात लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान; जिल्ह्यात ४१ हजार फर्स्ट टाइम व्होटर 

By विकास राऊत | Published: March 16, 2024 06:47 PM2024-03-16T18:47:44+5:302024-03-16T18:48:59+5:30

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३० लाख ३१ हजार ३१४ मतदार बजावणार मतदानांचा हक्क

Polling for Lok Sabha in Chhatrapati Sambhajinagar on May 13; 41 thousand first time voters in the district | छत्रपती संभाजीनगरात लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान; जिल्ह्यात ४१ हजार फर्स्ट टाइम व्होटर 

छत्रपती संभाजीनगरात लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान; जिल्ह्यात ४१ हजार फर्स्ट टाइम व्होटर 

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात १८ व्या लोकसभा निवडणूकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी पत्रकार परिषदेत देशातील लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राज्यात पहिल्या पाच टप्प्यात मतदान होणार आहे. जिल्ह्यात ३० लाख ३१ हजार ३१४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात फर्स्ट टाइम व्होटर म्हणजेच विशीच्या आतील ४१ हजार २७७ मतदार असून, ते पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. एकूण मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण १.३६ टक्के आहे. 

१६.८६ टक्के सीनिअर व्होटर
जिल्ह्यात ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेले १६.८६ मतदार आहेत. ५ लाख १० हजार ९०५ मतदार सीनिअर आहेत. ६० ते ६९ वय असलेले २,७४,९६४ मतदार आहेत. एकूण मतदारांच्या तुलनेत त्यांचे प्रमाण ९.७ टक्के आहे. ७० ते ७९ वयातील १,५१,४७१ मतदार असून, त्यांचे प्रमाण ५.०० टक्के, तर ८० हून अधिक वय असलेले ८४,४७० मतदार असून, त्यांचे प्रमाण २.७९ टक्के आहे.

थॉटर व्होटरची संख्या सर्वाधिक
३० ते ६० या वयातील मतदारांना थॉटर व्होटर असे म्हटले जाते. या मतदारांची संख्या जास्त आहे. ३० ते ३९ वयातील ७ लाख ५५ हजार ३८८ मतदार आहेत. एकूण मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण २४.९२ टक्के आहे. तर ४० ते ४९ या वयातील मतदारांचा आकडा ६ लाख ३२ हजार ९१२ असून, हे प्रमाणे २०.८८ टक्के आहे. ५० ते ५९ वयातील ४ लाख ६७ हजार ९३५ मतदार आहेत. त्यांचे प्रमाण १५.४४ टक्के आहे.

वयोगट..............मतदार.............टक्केवारी
१८ ते १९..........४१,२७७.............१.३६ टक्के
२० ते २९...........६,२२,८७९..........२०.५५ टक्के
३० ते ३९..........७,५५,३८८..........२४.९२ टक्के
४० ते ४९........६,३२,९१२...........२०.८८ टक्के
५० ते ५९.......४,६७,९३५...........१५.४४ टक्के
६० ते ६९........२,७४,९६४.........९.७ टक्के
७० ते ७९........१,५१,४७१.........५.०० टक्के
८० हून अधिक ...८४,४७०........२.७९ टक्के
एकूण..........३० लाख ३१ हजार ३१४....१०० टक्के

Web Title: Polling for Lok Sabha in Chhatrapati Sambhajinagar on May 13; 41 thousand first time voters in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.