गेवराईत कृउबासाठी शांततेत मतदान

By Admin | Published: February 27, 2017 12:40 AM2017-02-27T00:40:13+5:302017-02-27T00:41:32+5:30

गेवराई : येथील प्रतिष्ठेच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी रविवारी १८ जागेकरता १४ केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

Polling in silence for Chebur | गेवराईत कृउबासाठी शांततेत मतदान

गेवराईत कृउबासाठी शांततेत मतदान

googlenewsNext

गेवराई : येथील प्रतिष्ठेच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी रविवारी १८ जागेकरता १४ केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मंगळवारी मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहे.
कृउबावर सध्या आ. अमरसिंह पंडित यांचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यातील ही संस्था खेचण्यासाठी शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित, भाजपचे आ. लक्ष्मण पवार यांनी संयुक्तरित्या शेतकरी बचाव पॅनल उभा केला आहे. दुसरीकडे आ. पंडित यांनी स्वाभिमानी शेतकरी विकास आघाडीतर्फे कृउबातील सत्ता अबाधित ठेवण्यासाठी जोर लावला आहे. १८ जागेसाठी दोन पॅनलचे २६ उमेदवार आमने - सामने आहेत. रविवार सकाळी ८ ते दुपारी ४ या दरम्यान मतदान झाले. गेवराईसह तालुक्यातील उमापूर, तलवाडा, मादळमोही, जातेगाव, चकलांबा, धोडंराई येथील १४ मतदान केंद्रांवर प्रक्रिया पार पडली. सेवा सहकारी संस्था मतदार संघातील १४६१ पैकी १४३५ (९४.८४ टक्के), ग्रामपंचायत मतदारसंघात ११९२ पैकी १०८० (९०.६० टक्के), हमाल मापडी मतदारसंघात १२३ पैकी १२१ (९८ टक्के) व व्यापारी मतदारसंघात २५५ पैकी २४४ (९९ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
मंगळवारी शहरातील कापूस तंत्रज्ञान केंद्राच्या इमारतीत मतमोजणी होत आहे. त्याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले आहे. (वार्ताहर)

Web Title: Polling in silence for Chebur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.