शेंद्रा औद्योगिक क्षेत्रातील जलसाठे प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:02 AM2021-03-17T04:02:27+5:302021-03-17T04:02:27+5:30

या तलावाची दोन दशकापासून होणारी हेळसांड पाहता तलावशेजारील पशू आणि प्राणी जीवनचक्र पूर्णतः संपुष्टात आल्याचे दुर्दैवी चित्र उभे राहिले ...

Polluted reservoirs in Shendra industrial area | शेंद्रा औद्योगिक क्षेत्रातील जलसाठे प्रदूषित

शेंद्रा औद्योगिक क्षेत्रातील जलसाठे प्रदूषित

googlenewsNext

या तलावाची दोन दशकापासून होणारी हेळसांड पाहता तलावशेजारील पशू आणि प्राणी जीवनचक्र पूर्णतः संपुष्टात आल्याचे दुर्दैवी चित्र उभे राहिले आहे. कंपन्यांमधून दूषित पाणी शुद्धीकरण प्रक्रिया न करताच नाल्या आणि ओढ्याच्या माध्यमातून हे दूषित पाणी तलावात सोडले जात आहे या दूषित पाण्यामुळे रहिवासी लोकांच्या आजारी पडण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. सदरील पाझर तलाव हा कुंभेफळ ग्रामपंचायत हद्दीत येत असून, या दूषित तलावापासून पश्चिमेकडील जवळपास १०० हेक्टरपेक्षा अधिक परिसर निवासी तसेच शेतीसाठी वापरला जात आहे, परंतु तो अशुद्ध झाल्याने जनावरांनादेखील पिण्यायोग्य पाणी राहिले नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही

पाणी बाहेर जात नाही..

आमच्या कंपनीत कोणतेच दूषित पाणी बाहेर जात नाही. आम्ही पर्यावरणपूरक सर्व सुविधा निर्माण केलेल्या आहेत.

- व्यवस्थापकीय अधिकारी, एन. व्ही. रॅडिको डिस्टलरीज

कॅप्शन...

तलावात लाल व काळसर दिसणारे पाणी

Web Title: Polluted reservoirs in Shendra industrial area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.