धुळे संघाकडून जालना पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 11:55 PM2018-05-25T23:55:19+5:302018-05-25T23:55:52+5:30
धीरज सोनवणे आणि प्रफुल्ल धंगर यांची शतकी खेळी आणि आनंद जगताप याची सुरेख गोलंदाजी या बळावर धुळे संघाने घरच्या मैदानावर आज झालेल्या एमसीएच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत जालना संघावर एक डाव ६२ धावांनी मात केली. जालन्याकडून अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश काणे याने झुंजार अर्धशतक ठोकले.
औरंगाबाद : धीरज सोनवणे आणि प्रफुल्ल धंगर यांची शतकी खेळी आणि आनंद जगताप याची सुरेख गोलंदाजी या बळावर धुळे संघाने घरच्या मैदानावर आज झालेल्या एमसीएच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत जालना संघावर एक डाव ६२ धावांनी मात केली. जालन्याकडून अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश काणे याने झुंजार अर्धशतक ठोकले.
धुळे संघाने प्रथम फलंदाजी करीत त्यांचा पहिला डाव ६ बाद ४३२ धावांवर घोषित केला. त्यांच्याकडून धीरज सोनवणे याने सर्वाधिक १७0 चेंडूंत १७ चौकार व ६ षटकारांसह सर्वाधिक १६५ धावा फटकावल्या. प्रफुल्ल धंगर याने १७ चौकारांसह १३१ धावांची खेळी सजवली. सलामीवीर प्रशांत ढोले याने ६५ धावांचे योगदान दिले. जालना संघाकडून रामेश्वर दौड याने ८३ धावांत ३ गडी बाद केले. स्वप्नील पठाडेने २ व झुबेर कुरैशीने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात जालना संघाने ५३.३ षटकांत सर्वबाद २२४ धावा केल्या. जालना संघाकडून प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश काणे याने एकाकी झुंज देताना ५९ चेंडूंतच ९ चौकार व ४ षटकारांसह ८६ धावांची स्फोटक खेळी केली. स्वप्नील पठाडेने ६ चौकारांसह ६३ चेंडूंत ३५ आणि शोएब सय्यदने २९ व शुभम वर्माने २२ धावा केल्या. धुळे संघाकडून लोकेश देशमुख, आनंद जगताप, प्रीतेश पाटील यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. त्यानंतर धुळे संघाने दुसऱ्या डावात फलंदाजी न करता जालना संघावर फॉलोआॅन लादला. फॉलोआॅननंतर जालन्याचा संघ दुसºया डावात १४६ धावांत गारद झाला. जालना संघाकडून हिंदुराव देशमुखने ४ चौकार व २ षटकारांसह ४५, पहिल्या डावात झुंजार अर्धशतक ठोकणाºया व्यंकटेश काणे याने २७ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ३२ व शुभम वर्माने १९ धावा केल्या. धुळे संघाकडून आनंद जगतापने २७ धावांत ५ गडी बाद केले. गौरव देशमुख व लौकेश देशमुख यांनी प्रत्येकी २, तर सिद्धेश जोशीने १ गडी बाद केला.