वेरूळ लेणीत धावणार प्रदूषणविरहित बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:03 AM2021-04-20T04:03:26+5:302021-04-20T04:03:26+5:30

जागतिक वारसा दिनानिमित्त १८ एप्रिल रोजी या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. वेबिनार दरम्यान भारतवर्षीय दिगंबर जैन महासभेचे अध्यक्ष ...

Pollution free bus to run in Ellora Caves | वेरूळ लेणीत धावणार प्रदूषणविरहित बस

वेरूळ लेणीत धावणार प्रदूषणविरहित बस

googlenewsNext

जागतिक वारसा दिनानिमित्त १८ एप्रिल रोजी या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. वेबिनार दरम्यान भारतवर्षीय दिगंबर जैन महासभेचे अध्यक्ष निर्मलकुमार सेठी, जबलपूर विभागाचे अधीक्षक डॉ. सुजीत नयन, औरंगाबाद सर्कलचे अधीक्षक डॉ. मिलनकुमार चावला, के. सी. जैन, प्रा. लक्ष्मीचंद जैन, डॉ. रंजना जैन, डॉ. रंजना पटुरिया यांनी संवाद साधला.

यादरम्यान बोलताना मिलनकुमार यांनी वेरूळ, दौलताबाद या ठिकाणांची सविस्तर माहिती दिली. तसेच वेरूळ येथे बॅटरीवर चालणाऱ्या बसगाड्यांची व्यवस्था करण्यात येईल, असे सांगितले. प्रशांत देसरडा, महावीर ठोले, अशोक पांडे, राजकुमार कासलीवाल, वसंत वायकोस, नीलेश जैन यांनी डॉ. चावला यांचा सत्कार केला. डाॅ. यतीश जैन यांनी संचालन केले. प्रकाश पाटणी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले.

फोटो ओळ :

पुरातत्त्व खात्याच्या औरंगाबाद सर्कलचे अधीक्षक मिलनकुमार चावला यांचा सत्कार करताना मान्यवर.

Web Title: Pollution free bus to run in Ellora Caves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.