घोड्यावरून बोंडअळीचे पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:42 AM2017-12-27T00:42:17+5:302017-12-27T00:43:05+5:30

बोंडअळीमुळे झालेल्या कपाशीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी घोड्यावर स्वार होऊन शेतात जात असल्याने शेतकरी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. दहा दिवसांत हे काम आटोपणे शक्य नाही, म्हणून अधिका-यांनी घोड्याचा आधार घेतला आहे.

 Pony from the horse | घोड्यावरून बोंडअळीचे पंचनामे

घोड्यावरून बोंडअळीचे पंचनामे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वैजापूर : बोंडअळीमुळे झालेल्या कपाशीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी घोड्यावर स्वार होऊन शेतात जात असल्याने शेतकरी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. दहा दिवसांत हे काम आटोपणे शक्य नाही, म्हणून अधिका-यांनी घोड्याचा आधार घेतला आहे.
बोंडअळीमुळे तालुक्यातील ७६ हजार हेक्टरवर लागवड करण्यात आलेल्या कपाशीचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करुन दहा दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आले आहेत. हे पंचनामे करण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, सरपंच, पोलिस पाटील यांची पथके संपूर्ण तालुक्यात तैनात करण्यात आली आहेत.
पण पायी फिरून दहा दिवसात हे काम पूर्ण करणे अशक्य वाटत असल्याने अधिकाºयांनी चक्क घोड्यावर बसून हे पंचनामे पूर्ण करण्याची शक्कल लढवली आहे.
तालुक्यातील अंचलगाव येथे मंगळवारी तलाठी पैठणपगारे व इतर कर्मचारी चक्क घोड्यावर फिरून हे पंचनामे पूर्ण करत असल्याचे दिसले.
अधिकारी शेताच्या बांधावर घोड्यावर बसलेले पाहून ग्रामस्थ चांगलेच अचंबित झाले.
तालुक्यात नुकसानीचे क्षेत्र जास्त असल्याने या कर्मचाºयांना एका दिवसात केवळ ३० ते ४० शेतकºयांच्या बांधापर्यंत पोहचणे शक्य होत आहे.
५४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण
तालुक्यात कपाशीचे ७६ हजार हेक्टर क्षेत्र बोंडअळीने बाधित झालेले असून आतापर्यंत ५४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले असून, दोन दिवसांत संपूर्ण पंचनामे पूर्ण केले जाणार असल्याचे तहसीलदार सुमन मोरे यांनी सांगितले.
तालुक्यात एकूणच संपूर्ण कपाशीचे पीक बोंडअळी व किडीने पोखरले असून पंचनामे करणारी यंत्रणासुद्धा ही वास्तवता पाहून हादरली आहे. त्यामुळेच अधिकारी दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या युक्तीचा वापर करीत आहेत.

Web Title:  Pony from the horse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.