देऊळगाव बाजार ते आमठाणा रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:04 AM2021-09-18T04:04:37+5:302021-09-18T04:04:37+5:30
आमठाणा हे परिसरातील सर्वात मोठी बाजार पेठ असलेले गाव असून, येथे प्रा. आ. केंद्र, पेट्रोल पंप, बीएसएनएल ऑफिस, पोलीस ...
आमठाणा हे परिसरातील सर्वात मोठी बाजार पेठ असलेले गाव असून, येथे प्रा. आ. केंद्र, पेट्रोल पंप, बीएसएनएल ऑफिस, पोलीस चौकी आहे. यामुळे येथे देऊळगाव बाजार, सावखेडा, दिगाव या गावातील नागरिकांची ये-जा असते. मात्र, रस्त्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत.
रस्त्यामुळे आमठाणा आरोग्य केंद्रात रुग्णांना वेळेवर पोहोचता येत नाही. तसेच रस्त्यांअभावीच येथे तालुका डेपोतून एकही बसफेरी नाही. यामुळे प्रवाशांना आमठाण्यापर्यंत पायपीट करून तालुक्याला जावे लागते. औरंगाबादला जाण्यासाठी २५ कि.मी.चा फेरा वाचत असल्यामुळे प्रवासी याच मार्गे जातात, मात्र रस्त्याचे तीनतेरा वाजल्यामुळे पायी चालणेही कठीण झाले आहे. तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.