गरीब कामगारांना लुटणारे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:51 AM2017-08-28T00:51:24+5:302017-08-28T00:51:24+5:30
शेंद्रा एमआयडीसीत परराज्यातील कामगारांना अडवून मोबाइल व पैशाची लूटमार करणाºया चार जणांच्या टोळीतील दोघांना अटक केली,
लोकमत न्यूज नेटवर्क
करमाड : शेंद्रा एमआयडीसीत परराज्यातील कामगारांना अडवून मोबाइल व पैशाची लूटमार करणाºया चार जणांच्या टोळीतील दोघांना अटक केली, तर दोन जण फरार झाले.
मोबाइल हिसकावून मोटारसायकलीवर पळ काढणाºया आरोपीची मोटारसायकल खांबावर धडकली. घटनास्थळी मोटारसायकल सोडून आरोपी पसार झाला; परंतु गाडीचा शोध घेत आरोपी अमोल प्रदीप शेजवळ (२०), सागर सुंदरलाल शेजवळ (१९), रा. कुंभेफळ यांना कुंभेफळ येथून पोलिसांनी अटक केली. त्यांचे दोन साथीदार अद्यापही फरार आहेत.
शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता मनोज रजवाड (रा. कुंभेफळ) हा शेंद्रा एमआयडीसीतून कामाहून घरी पायी जात असताना मोटारसायकलीवरून आलेल्या दोघांनी अडवून मारहाण करून नगदी दहा हजार रुपये आणि दोन मोबाइल हिसकावून घेतले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याबाबत पोलीस उपनिरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी सांगितले की, शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास याच आरोपींनी एका कामगाराला लुटून पळून जात असताना त्यांची मोटारसायकल एमआयडीसीत एका खांबाला धडकली. यावेळी या चोरट्यांनी मोटारसायकल (क्रमांक एम. एच.२१ ए. झेड.६४६२ ) ही घटनास्थळी सोडून पळ काढला. येथील उपस्थित लोकांनी तात्काळ ही माहिती करमाड पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मोटारसायकल ताब्यात घेऊन कुंभेफळ येथे चौकशी केली. त्यानंतर आरोपी अमोल शेजवळ व सागर शेजवळ याला कुंभेफळ येथून ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध लूटमारीचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गोरख शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरदचंद्र रोडगे, जमादार श्रीकृष्ण दाणी, गंगाधर भताने, बाबाराव होळंबे करीत
आहेत.