ॲस्ट्राजेनेका अतिरिक्त जागतिक चाचणी करण्याची शक्यता
By | Published: November 28, 2020 04:04 AM2020-11-28T04:04:49+5:302020-11-28T04:04:49+5:30
लंडन/नवी दिल्ली : कोरोना लसीची कार्यक्षमता तपासण्यासाठी ॲस्ट्राजेनेका अतिरिक्त जागतिक चाचणी करण्याची शक्यता आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल ...
लंडन/नवी दिल्ली : कोरोना लसीची कार्यक्षमता तपासण्यासाठी ॲस्ट्राजेनेका अतिरिक्त जागतिक चाचणी करण्याची शक्यता आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सोरियट यांनी याबाबत संकेत दिले आहेत.
पास्कल सोरियट यांनी म्हटले आहे की, ही आणखी एक आंतरराष्ट्रीय चाचणी असेल. पण, ही प्रक्रिया वेगवान होईल. कारण, आम्हाला ठावुक आहे की, याची कार्यक्षमता अधिक आहे. काही तज्ज्ञांचे असे मत आहे की, अमेरिका आणि युरोपीय संघांची मंजुरी मिळविण्यासाठी काही अडचणी येऊ शकतात. त्या पार्श्वभूमीवर नव्याने चाचणीचे वृत्त आले आहे.
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने म्हटले आहे की, ॲस्ट्राजेनेका- ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची लस सुरक्षित आणि प्रभावी आहे. ॲस्ट्राजेनेका- ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने त्रुटी स्वीकारल्याच्या वृत्तानंतर याबाबत चर्चा सुरू झाली आहे. ही लस अत्यंत प्रभावी असल्याचा दावा कंपनी आणि युनिव्हर्सिटीकडून करण्यात आल्यानंतरच्या या घडामोडी आहेत, हे विशेष. या पार्श्वभूमीवर सिरमने म्हटले आहे की, लोकांनी घाबरून जाऊ नये. संयम ठेवावा. ही लस सुरक्षित आणि कार्यक्षम आहे. तिचा कमी प्रभावी परिणाम ६० ते ७० टक्के आहे. सिरम भारतात ॲस्ट्राजेनेकाची चाचणी करत आहे.
.......