मुंबई विमानसेवा सुरू होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:31 AM2017-10-25T00:31:43+5:302017-10-25T00:32:07+5:30
नांदेड विमानतळाच्या रन वे (धावपट्टी) दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे़ त्यासाठी नांदेड विमानतळावरून २९ आॅक्टोबर ते १५ नोव्हेंंबर या कालावधीत कोणतेही विमान उडणार नाही़ तर सध्या सुरू असलेली नांदेड - हैदराबाद विमान सेवा १५ दिवसांसाठी बंद राहणार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : नांदेड विमानतळाच्या रन वे (धावपट्टी) दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे़ त्यासाठी नांदेड विमानतळावरून २९ आॅक्टोबर ते १५ नोव्हेंंबर या कालावधीत कोणतेही विमान उडणार नाही़ तर सध्या सुरू असलेली नांदेड - हैदराबाद विमान सेवा १५ दिवसांसाठी बंद राहणार आहे़
नांदेड विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न करण्यात आले. सुरूवातीच्या काळात नांदेड-मुंबई, नांदेड-दिल्ली अशी विमानसेवा सुरू करण्यात आली. मात्र प्रवासी मिळत नसल्याच्या कारणाने टप्याटप्प्याने ह्या सेवा बंद करण्यात आल्या़
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी उड्डाण या योजनेअंतर्गत नांदेड-हैदराबाद विमानसेवा सुरू करण्यात आली होती़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उड्डाण या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पाच विमानतळांचा समावेश केला होता. यात नांदेड विमानतळाचाही समावेश आहे़ या योजनेअंतर्गत नांदेड विमानतळावरून नांदेड-हैदराबाद व नांदेड-मुंबई ट्रु जेट या विमान कंपनीला या मार्गावर प्रवासी विमानसेवा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली़ केवळ नांदेड विमानतळावरून नांदेड -हैदराबाद उड्डाण योजनेतंर्गत ट्रु जेट या विमान कंपनीने २८ एप्रिल रोजी ही सेवा सुरू केली. यावेळी लवकरच मुंबई, दिल्ली, मोहाली विमानसेवा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते़ परंतु, हैदराबाद विमानसेवा सुरू होवून सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी नांदेड-मुंबई विमानसेवा उपलब्ध झाली नाही.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नांदेड - अमृतसर या विमानसेवेसाठी एअरलायन्स या कंपनीच्या अधिकाºयांनी विमानतळाची पाहणी केली़ संबंधित अधिकाºयांनी रन वे (धावपट्टी) खराब झाल्यामुळे या ठिकाणाहून सेवा सुरू करता येणार नाही, यासाठी रन वे तत्काळ दुरूस्ती करावा, अशा सूचना दिल्या होत्या़ यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अर्जुन खोतकर, माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी रन वे ची दुरूस्ती करण्यासाठी विमानळच्या देखभालीची जबाबदारी असणाºया रिलायन्स कंपनीकडे पाठपुरावा केला होता.
२९ आॅक्टोबरपासून रन वेच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम १५ दिवस चालणार असल्याने १५ नोव्हेंबरपर्यंत या विमानतळावरून विमानसेवा बंद राहणार आहे़