पोस्टाची जबरदस्त योजना, ३९९ रुपयांत १० लाखांचा विमा; किती जणांना मिळाला लाभ?

By साहेबराव हिवराळे | Published: October 12, 2023 07:35 PM2023-10-12T19:35:46+5:302023-10-12T19:35:57+5:30

पोस्टाची ही अपघात विमा काढण्यासाठी योजना असल्याने शासनाच्या या उपक्रमात अनेकांनी सहभाग घेण्यावर भर दिलेला आहे.

Post office awesome plan, 10 lakh insurance at Rs 399; How many people benefited? | पोस्टाची जबरदस्त योजना, ३९९ रुपयांत १० लाखांचा विमा; किती जणांना मिळाला लाभ?

पोस्टाची जबरदस्त योजना, ३९९ रुपयांत १० लाखांचा विमा; किती जणांना मिळाला लाभ?

छत्रपती संभाजीनगर : भारतीय डाक विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या विमा योजनेत ३९९ रुपयांत १० लाखांचे विमा कवच दिले जाते. मराठवाड्यात १ लाख ५२ हजार ७३१ नागरिकांनी हा विमा उतरविला आहे. त्यात छत्रपती संभाजीनगरात २२८२३ नागरिकांनी वर्षभरात विमा घेतला आहे. शहरात ७४ जण विमादावा मिळण्याच्या प्रक्रियेत आहेत.

भारतीय डाक विभागाने सर्वसामान्यांना विमा कवच दिले आहे. अपघात झाल्यानंतर किंवा गंभीर जखमी झाल्यावर दवाखान्यात उपचारासाठी लागणारा खर्च करणे कठीण होऊन जाते. त्यामुळे टपाल कार्यालयाने ही योजना काढल्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळत आहे.

१० लाखांचा विमा
३९९ च्या विमा हप्ता योजनेत विमाधारकाच्या अपघाती मृत्यूनंतर दोन मुलांना १ लाखापर्यंतची मदत मिळू शकते. तसेच अपघातानंतर दवाखान्यात जाण्यासाठी कुटुंबीयांना १० दिवसांपर्यंत प्रति दिवस १ हजार रुपये मिळतात. वाहतूक खर्च २५ हजार व मृत्यूनंतर ५ हजार अंत्यसंस्कारासाठी मिळतात. या योजनेची मुदत एक वर्ष असते. दरवर्षी नूतनीकरण करावे लागते.

२३ हजार जणांनी काढला विमा
पोस्टाची ही अपघात विमा काढण्यासाठी योजना असल्याने शासनाच्या या उपक्रमात अनेकांनी सहभाग घेण्यावर भर दिलेला आहे. छत्रपती संभाजीनगरात २२८२३ नागरिकांनी वर्षभरात विमा घेतला आहे.

या वर्षात कोटीपर्यंत भरपाई
वर्षभरात ७४ जणांनी शहरात विमा काढलेला असून विभागात २४२ प्रकरणांचा निपटारा झाला तर ३७८ केसेस प्रक्रियेत आहेत. यातून कोटीपर्यंतही भरपाई जाऊ शकते.

विमा कसा काढाल?

पोस्ट ऑफिस अपघाती विमा योजना
नागरिकांना १० लाख रु.पर्यंत अपघाती विमा संरक्षण देणे सुरू आहे. या उपक्रमात पात्रता भारतीय नागरिक आणि पोस्ट बँकेत खाते आवश्यक. योजनेसाठी हप्ता ३९९ रु. आणि २९९ रु. असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. टाटा आणि बजाज समूहाच्या काही नेटवर्क इस्पितळांमध्ये ‘कॅशलेस’ उपचारांची सुविधा केवळ ३९६ रुपयांत मिळू शकते. २९९ रुपयांच्या योजनेत तुलनेने फायदे थोडे कमी आहेत.

जनतेसाठी फायद्याचे कवच...
पोस्टाने अनेक योजना सुरू केलेल्या असून, सामान्य नागरिक तसेच अधिकारीवर्गाचाही पोस्टावर अधिक विश्वास आहे. अगदी छोट्या रकमेत संरक्षण कवच देण्यात येते.
- अशोक धनवडे, प्रवर डाक अधीक्षक

Web Title: Post office awesome plan, 10 lakh insurance at Rs 399; How many people benefited?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.