राख्या पोहोचवून पंधरा दिवसांतच पोस्ट झाले मालामाल

By साहेबराव हिवराळे | Published: September 8, 2023 04:47 PM2023-09-08T16:47:02+5:302023-09-08T16:47:38+5:30

पोस्टातर्फे वॉटरप्रूफ कव्हरचा रेट फक्त दहा रुपये ठेवण्यात आलेला होता.

post office got huge revenue within 15 days after Rakhi was delivered | राख्या पोहोचवून पंधरा दिवसांतच पोस्ट झाले मालामाल

राख्या पोहोचवून पंधरा दिवसांतच पोस्ट झाले मालामाल

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : राखी पौर्णिमेनिमित्त टपाल कार्यालयाने विशेष लिफाफे विक्रीला ठेवले होते. पंधरवड्यात पाच हजार पाकिटांची विक्री झाली. त्यातून शहरातील टपाल कार्यालयांना अर्ध्या लाखाची कमाई झाली. एरव्हीची रोज आठ ते दहा हजार टपाल पाकिटे (रजिस्टर्ड व स्पीड पोस्ट) याशिवाय वेगळी आहेतच. पोस्टमनकडे ठिकठिकाणच्या भावांचे लक्ष लागून होते.

पोस्टाचे बुकिंग किती?
शहरातून दररोज आठ ते दहा हजारांच्या आसपास दररोजची नोंदणी असते. गेल्या काही दिवसांत पोस्टाने काढलेल्या राखींसाठीच्या खास पाकिटांची विक्री अधिक प्रमाणात झाली आहे. देशविदेशात जाणाऱ्या पार्सल, आंतरराष्ट्रीय बुकिंगचा रेट देखील वेगवेगळा ठरलेला आहे.

प्रकार रक्कम
स्पीड पोस्ट ५० ग्रॅमसाठी ४१ रुपये
रजिस्टर्ड २० ग्रॅमसाठी २२ रुपये
पार्सल ५०० ग्रॅमसाठी ३६ रुपये

आंतरराष्ट्रीय बुकिंग
स्पीड पोस्ट, रजिस्टर, पार्सलसाठी प्रत्येक देशानुसार वेगवेगळा ठरलेला आहे.
पावसासाठी वॉटरप्रूफ कव्हर
पोस्टातर्फे वॉटरप्रूफ कव्हरचा रेट फक्त दहा रुपये ठेवण्यात आलेला होता.

५ हजार राखी पाकिटे भाऊरायाकडे पोहोचविली
शहरातून टपाल खात्यातून विक्रीसाठी ठेवलेल्या पाकिंटापैकी पाच हजार पाकिटे विक्री झाली असून, वेगवेगळ्या रजिस्टर्ड, पार्सलची संख्या याशिवाय वेगळी आहे.

अर्ध्या लाखाची कमाई
शहरात पाकिटे विक्रीतून अर्ध्या लाखाची कमाई पोस्टाला झाली तर रजिस्टर्ड, पार्सल, स्पीड पोस्टची कमाई ही वेगळीच आहे. त्याचा नफा पाच लाखांपेक्षाही अधिक आहे. पाकिटात काय आहे, असे सांगता येत नाही. परंतु शक्यतो राख्या अधिक असाव्यात.
-अशोक धनवडे, प्रवर डाक अधीक्षक

Web Title: post office got huge revenue within 15 days after Rakhi was delivered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.