सहा महिन्यांपासून बंद असलेले पोस्ट ऑफिस अखेर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:02 AM2021-05-18T04:02:57+5:302021-05-18T04:02:57+5:30
जायकवाडी : संत एकनाथ सहकारी साखर कारखाना परिसरातील पोस्ट ऑफिस गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. यामुळे नागरिकांसह खातेधारकांची गैरसोय ...
जायकवाडी : संत एकनाथ सहकारी साखर कारखाना परिसरातील पोस्ट ऑफिस गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. यामुळे नागरिकांसह खातेधारकांची गैरसोय होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ८ मे २०२१च्या अंकात प्रकाशित केले होते. यानंतर पोस्ट विभाग खडबडून जागा झाला असून, बंद असलेले पोस्ट ऑफिस अखेर सुरू करण्यात आले आहे.
पैठण एमआयडीसी परिसरातील संत एकनाथ साखर कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात असलेली कामगार वसाहत व परिसरातील इतर गावांसाठी सदरील पोस्ट ऑफिस सुरू असणे गरजेचे होते. मात्र सप्टेंबर २०२० पासून ते बंद असल्याने अनेकांची गैरसोय होत होती. तसेच जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नागपूर येथे सेवापुस्तक पडताळणीसाठी पाठवावे लागते. मात्र पोस्ट ऑफिस बंद असल्याने कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. तसेच नागरिक, कामगारांना बचत खात्यात पैसे भरण्यासाठी पैठणला जावे लागते.
मात्र लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पोस्ट विभागाने याची दखल घेत पोस्ट ऑफिस सुरू केले आहे. यामुळे कर्मचारी आणि सामान्य नागरिकांची होणारी गैरसोय टळली आहे. त्यामुळे नागरिकांनी लोकमतचे आभार व्यक्त केले.
फोटो : बातमीचे कात्रण
170521\11dac21.jpg
बातमीचे कात्रण