पदव्युत्तरच्या परीक्षा आठ दिवस पुढे ढकलल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 07:50 PM2018-10-19T19:50:15+5:302018-10-19T19:50:33+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा आठ दिवस पुढे ढकलल्या आहेत. २२ आक्टोबर रोजी सुरू होणाऱ्या परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार ३१ आक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सांगितले.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा आठ दिवस पुढे ढकलल्या आहेत. २२ आक्टोबर रोजी सुरू होणाऱ्या परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार ३१ आक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सांगितले. या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना गोंधळानेच सुरूवात झाल्याने पदव्युत्तर परीक्षांबाबत परीक्षा विभाग विशेष काळजी घेत आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे हॉलतिकिट, परीक्षा केंद्र अंतिम करण्यात येत आहेत. ३१ आक्टोबर रोजी सुरू होणाºया पदव्युत्तर परीक्षा विषयानुसार २२ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहेत. या परीक्षेसाठी ४९ परीक्षा केंद्र देण्यात येणार असून, ३५ हजार ६३२ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. एम.ए., एम.कॉम., एम.एसस्सी., एमबीए, एमसीए, बीएड, एम.एड., डी.बी.एम., एम.लिब. आदी अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे. या परीक्षेत ४ ते ११ नोव्हेंबर दरम्यान दिवाळीची सुट्टी देण्यात आली असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
पदवी परीक्षेत सहकेंद्रप्रमुख रूजू होईनात
विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना सुरुवात होऊन चार दिवस झाले तरी अद्यापही २२५ पैकी केवळ ८६ सहकेंद्रप्रमुख कामावर रूजू झाले. उर्वरित सहकेंद्रप्रुखांना प्राचार्यांनी परीक्षेच्या कामासाठी सुट दिली नसल्याचे समोर आले आहे.
विनाअनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या नेमणुका
विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत भरारी पथके आणि सहकेंद्रप्रमुखांच्या नेमणुकींमध्ये भेदभाव करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. अनुदानित महाविद्यालयांतील वरिष्ठ प्राध्यापकांना डावलून विनाअनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांना महत्वाच्या समित्यांवर नियुक्त्या दिल्यामुळे प्राध्यापकांमध्ये नाराजी पसरील आहे.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात आले होते. हे अर्ज दाखल करण्याची मुदत नुकतीच संपली आहे. मात्र कॅरिआॅनची मागणीसह इतर समस्या निर्माण झाल्या होत्या. यात विद्यार्थ्यांकडून मागणी आल्यास आणखी काही दिवस अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ देण्यात येईल.
- डॉ. जयश्री सुर्यवंशी, परीक्षा संचालक