पोस्टमन म्हणजे आता चालती फिरती बँक; घरीच लाभार्थ्यांना विनाशुल्क मिळणार पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 15:42 IST2025-02-04T15:41:35+5:302025-02-04T15:42:17+5:30
संजय गांधी, दिव्यांग व इतर लाभार्थ्यांना हे माहीत आहे का?

पोस्टमन म्हणजे आता चालती फिरती बँक; घरीच लाभार्थ्यांना विनाशुल्क मिळणार पैसे
छत्रपती संभाजीनगर : संजय गांधी निराधार योजना तसेच दिव्यांग आणि इतर लाभार्थ्यांना शासनाकडून येणारे अनुदान काढण्यासाठी खासगी सेंटरवर सर्व्हिस चार्ज मोजावा लागतो. निराधार त्यात पुन्हा पैशाचा मार ! म्हणून गरिबांना मोफत पैसे काढण्यासाठी आता वस्तीत येणाऱ्या पोस्टमनकडेच कोणत्याही बँकेचे पैसे मोफत काढण्याची सोय पोस्टाने केलेली आहे.
एक तर फायली प्रलंबित असल्याने वारंवार चकरा मारूनही वेगवेगळ्या अडचणी सांगितल्या जातात. लाभार्थी वृद्ध महिला व पुरुषांना रिक्षा भाडे, खासगी सेवा सेंटरवर द्यावा लागणारा पैसा अशा अडचणी जाणवतात. त्यामुळे इंडिया पोस्टने पुन्हा मनिऑर्डरची पद्धत नव्या रूपात आणली आहे. त्यात पोस्टमनकडे ईएपीएस मशीन दिले असून, त्यातून आधार कार्डवर पासबुक लिंक तपासून कोणत्याही बँकेतील पैसे काढता येतील.
अडचणींवर इंडिया पोस्टची मात...
वयोवृद्धांना टपाल कर्मचाऱ्याकडून विनाशुल्क पैसे काढता येतील. कर्मचारी सर्वत्र टपाल पोहोचवितात. त्यांना वयोवृद्धांना अनुदानाचे पैसे काढण्यासाठी मागणी करा. सर्व्हिस चार्ज न घेता सेवा मिळेल.
- देवेंद्र परदेशी, कामगार नेते, सर्कल उपाध्यक्ष.