सत्ताधार्‍यांची गुत्तेदारी; मनपा कर्जबाजारी

By Admin | Published: May 14, 2014 12:05 AM2014-05-14T00:05:43+5:302014-05-14T00:30:32+5:30

विकास राऊत , औरंगाबाद महापालिकेच्या आर्थिक नियोजनाची घडी विस्कटली आहे. चार वर्षांतील उधळपट्टी आणि मर्जीतील कामांवर केलेल्या अनाठायी खर्चामुळे पालिकेची तारांबळ होत आहे.

Power confrontation; Municipal Debtors | सत्ताधार्‍यांची गुत्तेदारी; मनपा कर्जबाजारी

सत्ताधार्‍यांची गुत्तेदारी; मनपा कर्जबाजारी

googlenewsNext

 विकास राऊत , औरंगाबाद महापालिकेच्या आर्थिक नियोजनाची घडी विस्कटली आहे. चार वर्षांतील उधळपट्टी आणि मर्जीतील कामांवर केलेल्या अनाठायी खर्चामुळे पालिकेची तारांबळ होत आहे. सत्ताधार्‍यांपैकी काही जणांनी बहुतांश रस्त्यांच्या इतर कामांत पार्टनरशिपमध्ये गुत्तेदारी सुरू केल्यामुळे मनपा कर्जबाजारी होत आहे. खर्चाच्या प्राधान्याला फाटा देऊन स्वत:ची बिले अगोदर मंजूर करून घेतली जातात. लेखा विभाग सत्ताधार्‍यांनी दावणीला बांधून ठेवल्याने विकासकामे ठप्प पडली आहेत. २०० कोटींच्या कर्जापोटी मनपाने तीन वर्षांत ७२ कोटी रुपये व्याज, मुद्दल म्हणून बँकेला भरले आहेत. यापुढेही तशीच अवस्था राहण्याची शक्यता आहे. सत्ताधार्‍यांमधील काही पदाधिकार्‍यांची कंत्राटदारांसोबत असलेली भागीदारी पालिकेला गोत्यात आणू पाहत आहे. मागील पाच वर्षांमध्ये महापालिकेच्या तिजोरीत १०६ ते ४५० कोटी रुपये आले. यातील ८० टक्के निधी पगार, अत्यावश्यक खर्च बोगस कामांवर करण्यात आला. हा अलबेल कारभार थांबविण्याची धमक पाच वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त दिलीप बंड यांनी दाखविली होती. त्यानंतर मनपातील आर्थिक उधळपट्टीला कुणीही लगाम घालू शकलेला नाही. प्रशासनाच्या या बोटचेपे धोरणामुळे शहरातील १५ लाखाहून अधिक नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा मिळत नाहीत. लेखा विभाग दावणीला बांधकाम परवानगीशी निगडित संचिकांना मुदतवाढ दिल्याने दीड कोटींचे नुकसान झाले़ एएमटी शहर बससेवेमध्ये दिलेल्या बनावट धनादेशामुळे मनपाचे आर्थिक नुकसान झाले व बससेवा बंद पडली़ मनपाच्या बँक खात्यावर रक्कम नसताना दणादण धनादेश वाटले़ ते धनादेश बाऊन्स झाले़ चार कर्मचार्‍यांचा पीएफ दरमहा जमा केला नाही़ दोन-दोन महिने पीएफ जमा करण्यास उशीर होतो आहे. चार वर्षांत १५ कोटी रुपयांचे धनादेश बाऊन्स झाल्याचे कळते. वीज मंडळाचा धनादेश बाऊन्स होण्याचे प्रकार घडले. तातडीच्या कामांच्या नावाखाली अनेक कामांवर शिफारस करून पैसा खर्च होतो आहे. वर्षअर्थसंकल्पप्रत्यक्ष जमा आर्थिक तूट २०१०-११३९५ कोटी ५३ लाख २८४ कोटी ४० लाख १०६ कोटी ४० लाख २०११-१२४४८ कोटी २५ लाख२९५ कोटी ६४ लाख१५३ कोटी ८० लाख २०१२-१३७८६ कोटी २० लाख३८० कोटी १५ लाख३०६ कोटी २० लाख २०१३-१४९०० कोटी २४ लाख४५० कोटी ३५ लाख४५० कोटी ३५ लाख २०१४-१५५४९ कोटी ११ लाखआर्थिक वर्ष सुरू आहेआर्थिक वर्ष सुरू आहे

Web Title: Power confrontation; Municipal Debtors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.