म्हसोबानगरात विजेचा लपंडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:02 AM2021-04-03T04:02:01+5:302021-04-03T04:02:01+5:30
म्हसोबानगर व परिसरात मोठी नागरी वसाहत झालेली आहे. ऑडिटर सोसायटी, साफल्यनगर, रश्मीनगर, अशोकनगर, शिवेश्वर कॉलनी, व्यंकटेशनगर आदी नागरी वसाहतीत ...
म्हसोबानगर व परिसरात मोठी नागरी वसाहत झालेली आहे. ऑडिटर सोसायटी, साफल्यनगर, रश्मीनगर, अशोकनगर, शिवेश्वर कॉलनी, व्यंकटेशनगर आदी नागरी वसाहतीत घरगुती वीज पुरवठा सायंकाळी, रात्री-बेरात्री कधीही खंडित केला जातो. विद्युत पुरवठा खंडित करण्याअगोदर कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही. महावितरणच्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कसलाही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची ग्राहकांची तक्रार आहे.
सध्या शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास सुरू आहे त्यासाठी मोबाईलची बॅटरी चार्जिंग करण्यासाठीसुद्धा विद्युत पुरवठा अखंडितपणे सुरू राहणे अपेक्षित असते. या भागातील वीज पुरवठा कायमस्वरूपी सुरळीत ठेवण्यासाठी म्हसोबा मंदिराजवळ एक रोहित्र कार्यरत आहे. परंतु तरीही तांत्रिक कारण पुढे करून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण या भागात वाढलेले दिसून येते.