वीजपुरवठा खंडित ; पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:03 AM2021-02-20T04:03:57+5:302021-02-20T04:03:57+5:30

औरंगाबाद: जायकवाडी धरणात बुधवारी रात्री १४०० मिलिमीटर व्यासाच्या जलयोजनेवरील पंपगृहातील ट्रान्सफॉर्मरला वीजपुरवठा करणारे केबलमध्ये बिघाड झाल्यामुळे बुधवारी रात्रीपासून शहराचा ...

Power outage; Water supply bottlenecks | वीजपुरवठा खंडित ; पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ

वीजपुरवठा खंडित ; पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ

googlenewsNext

औरंगाबाद: जायकवाडी धरणात बुधवारी रात्री १४०० मिलिमीटर व्यासाच्या जलयोजनेवरील पंपगृहातील ट्रान्सफॉर्मरला वीजपुरवठा करणारे केबलमध्ये बिघाड झाल्यामुळे बुधवारी रात्रीपासून शहराचा पाणीपुरवठा बंद होता. गुरुवारी सायंकाळपर्यंत पर्यायी ट्रान्सफार्मर वीजपुरवठा करीत पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. दरम्यान, शहरासह सिडको-हडकोतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. गेल्या आठवड्यात रेल्वेस्टेशन रोडवरील अहिल्याबाई होळकर चौकात १४०० मि.मी.जलवाहिनीला भगदाड पडल्याने सिडको-हडकोतील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यानंतर गुरुवारी पुन्हा पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेनंतर पाणी उपसा सुरू करण्यात आल्याची माहिती मनपा उपअभियंता घुले यांनी दिली. कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी जायकवाडी पंपगृहा परिसराची पाहणी केली. ट्रान्सफाॅर्मर बिघडला आहे. त्यांची दुरूस्ती होईपर्यंत पर्याची व्यवस्था केली आहे. सायंकाळी शहराचा पाणीपुरवठा सुरू होणार असून, दरम्यानच्या काळात पाणी उपसा बंद असल्याने सिडको-हडकोतील पाणीपुरवठ्याचे टप्पे एक दिवस ढकलल्याचे धांडे यांनी सांगितले.

Web Title: Power outage; Water supply bottlenecks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.