मराठवाड्यात १३ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:02 AM2021-02-06T04:02:11+5:302021-02-06T04:02:11+5:30

औरंगाबाद : महावितरणने मराठवाड्यात तब्बल १३ लाख ९२ हजार ३१३ ग्राहकांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केला आहे. या ग्राहकांकडे १ ...

Power supply to 13 lakh consumers in Marathwada permanently cut off | मराठवाड्यात १३ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित

मराठवाड्यात १३ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित

googlenewsNext

औरंगाबाद : महावितरणने मराठवाड्यात तब्बल १३ लाख ९२ हजार ३१३ ग्राहकांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केला आहे. या ग्राहकांकडे १ हजार १२१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या ग्राहकांना थकबाकीचा भरणा न करताच नवीन वीजपुरवठा दिलेला आहे का, आता याची पाहणी करण्याचे निर्देश महावितरणने कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

वीजबिलाची थकबाकी न भरता त्याच अथवा इतर नावाने, नवीन वीजजोडणी दिल्याचे आढळून आल्यास आणि संबंधित ग्राहकांनी थकबाकी न भरल्यास त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांनी दिले आहेत. वीज ग्राहकांना वारंवार सूचना, विनंत्या करूनही थकीत वीजबिल न भरल्यास तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येते. त्यानंतरही वीज ग्राहकाने थकीत वीजबिलाचा भरणा न केल्यास कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येते.

...अन्यथा कडक कारवाई

थकबाकीसाठी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ठिकाणी वीजग्राहकांनी थकबाकीच्या संपूर्ण रक्कमेचा भरणा करूनच नियमानुसार नवीन वीजजोडणी घ्यावी, अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश डॉ. नरेश गिते यांनी दिले आहेत.

अशी आहे थकबाकी

परिमंडळ ग्राहक थकबाकी (कोटींमध्ये)

औरंगाबाद- ४,१८,९२७ ३९२. ८८

लातूर- ५,४५,१२२ ३६९. ९२

नांदेड- ४,२८,२६४ ३५८. ७६

एकूण- १३,९२,३१३ १,१२१. ५६

Web Title: Power supply to 13 lakh consumers in Marathwada permanently cut off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.