४२ झोपडपट्टीधारकांना पीआर कार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:10 AM2017-11-23T00:10:13+5:302017-11-23T00:10:52+5:30
जालना शहरातील ४२ झोपडपट्टीधारकांना लवकरच पीआर कार्ड मिळणार आहे. तसे निर्देश मुख्यमंत्र्यांचे अप्पर सचिव प्रवीण परदेशी यांनी संबंधित अधिका-यांना दिले आहेत. जिल्ह्यातील विविध विकासकामांचा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मंत्रालयात बुधवारी आढावा घेतला. यावेळी हे निर्देश देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहरातील ४२ झोपडपट्टीधारकांना लवकरच पीआर कार्ड मिळणार आहे. तसे निर्देश मुख्यमंत्र्यांचे अप्पर सचिव प्रवीण परदेशी यांनी संबंधित अधिका-यांना दिले आहेत. जिल्ह्यातील विविध विकासकामांचा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मंत्रालयात बुधवारी आढावा घेतला. यावेळी हे निर्देश देण्यात आले.
जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांसह कृषी विषयक योजनांचा राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी मंत्रालयात उच्चपदस्थ अधिकाºयांच्या विशेष बैठकीत आढावा घेतला. बैठकीला मुख्यमंत्र्याचे अप्पर सचिव प्रवीण परदेशी यांच्यासह संबंधित खात्यांचे सचिव आणि जालना जिल्ह्यातील विविध विभागांच्या प्रमुख अधिकाºयांची उपस्थिती होती.
यावेळी जालना शहरातील नुतन वसाहत, इंदिरानगर, कन्हैयानगर, शंकरनगर, संजयनगर, चंदनझिरा, रामनगर, गांधीनगर, ख्रिस्ती कँम्प या भागातील ४२ झोपडपट्टी धारकांना पीआरकार्ड देण्याचे निर्देश अप्पर सचिव प्रवीण परदेशी यांनी अधिकाºयांना दिले.
बैठकीत जालना-अंबड-वडीगोद्री रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम त्वरित सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
तसेच जालना-गाढे सावरगाव-घनसावंगी या रस्त्याचे काम लवकर सुरूवात करणे, आरसीएसआर मार्फत बदनापूर येथे तूर संशोधन केंद्र सुरू करणे, सीड पार्क, रसायन तंत्रज्ञान संस्था, समृद्धी बाधित शेतकºयांना मोबदला देणे आदी कामांना गती देण्याचे निर्देशही राज्यमंत्री खोतकर यांनी बैठकीत संबंधित विभागांच्या अधिकाºयांना दिले. शेतकºयांकडील कापूर आणि सोयाबीन व्यापारी कमी दराने खरेदी करत आहे. त्यामुळे तातडीने कापूस, सोयाबीन खरेदी केंद्र सुरुकरावे. तसेच परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्याा सोयाबीन, मका, कापूस, द्राक्ष, मोसंबी पिकांच्या नुकसानीची भरपाई शेतकºयांना देण्याच्या मुद्यांवरही बैठकीत चर्चा झाली.
जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांसह, शेतकºयांशी निगडित प्रश्नांवर बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे राज्यमंत्री खोतकर यांनी सांगितले.