प्रभागरचना, आरक्षण कार्यक्रम
By Admin | Published: January 31, 2016 11:34 PM2016-01-31T23:34:54+5:302016-01-31T23:37:14+5:30
हिंगोली : नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागरचना व आरक्षणाचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे.
हिंगोली : औंढा तालुक्यातील जुलै ते डिसेंबर २०१६ या कालावधीत मुदती संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे व नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागरचना व आरक्षणाचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत (सदस्यांची संख्या, प्रभागात विभाजन करणे व जागा राखून ठेवणे) नियम १९६६ मधील नियम- २ अ नुसार प्रारुप प्रभाग रचना, आरक्षणाबाबत नियम ५ मधील पोट नियम(२)च्या नमुना - ब अन्वये हरकती व सूचना मागविण्यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध २८ जानेवारी रोजी औंढा तहसिल कार्यालयाचे व संबंधित ग्रामपंचायत कार्यालयाचे व इतर आवश्यक ठिकाणी प्रसिद्ध केली आहेत. व त्यावरील हरकती व सूचना ६ फेब्रुवारीपर्यंत घेण्यात येतील. यामध्ये प्राप्त झालेल्या हरकती व सूचना ९ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)