कोरिया संघाचा आशियाई स्पर्धेसाठी भारतात सराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 12:51 AM2017-12-03T00:51:57+5:302017-12-03T00:52:14+5:30
दक्षिण कोरियाचा हॉकी संघ पुढील वर्षी होणाºया विश्वचषकात स्थान न मिळवल्यामुळे निराश आहे. तथापि, त्यांनी २0१८ च्या आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी चांगलीच कंबर कसली आहे आणि एवढेच नव्हे तर हॉकी विश्व लीग फायनलमध्ये सहभागी होणाºया आघाडीच्या संघांचा खेळ पाहण्यासाठी ते भारताच्या छोट्याशा दौºयावरदेखील आले आहेत.
भुवनेश्वर : दक्षिण कोरियाचा हॉकी संघ पुढील वर्षी होणाºया विश्वचषकात स्थान न मिळवल्यामुळे निराश आहे. तथापि, त्यांनी २0१८ च्या आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी चांगलीच कंबर कसली आहे आणि एवढेच नव्हे तर हॉकी विश्व लीग फायनलमध्ये सहभागी होणाºया आघाडीच्या संघांचा खेळ पाहण्यासाठी ते भारताच्या छोट्याशा दौºयावरदेखील आले आहेत.
यादरम्यान कोरिया संघातील खेळाडू सराव सामनेदेखील खेळणार आहेत. विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरवण्यासाठी कोरियाला आॅक्टोबर महिन्यात ढाका येथे झालेली आशियाई चषक स्पर्धेत विजेतेपद पटकावणे आवश्यक होते; परंतु त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताने तब्बल १0 वर्षांनंतर ही स्पर्धा जिंकण्यात यश मिळवले होते.
निराशाजनक कामगिरीनंतर तात्काळ कोरियन संघ व्यवस्थापनाने राष्ट्रीय संघाला भुवनेश्वरला पाठवण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे ते स्थानिक संघ आणि एचडब्ल्यूएलमध्ये खेळणाºया संघासोबत सराव सामना खेळू शकेल.
कोरिया संघाचे प्रशिक्षक शीन सेओक क्यो म्हणाले, ‘‘जे घडले ते बदलले जाऊ शकत नव्हते. हे आमच्या हातात नाही; परंतु भविष्यात चांगले बनण्यासाठी मेहनत करू शकतो आणि या दौºयाचा हेतू स्वत:ला पुढील आशियाई स्पर्धेसाठी तयार करणे हा आहे. हा दौरा २0१८ मध्ये जकार्ता येथे होणाºया आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी आहे. आम्ही येथे २0 खेळाडूंसह येथे आलो आहोत आणि त्यात १0 युवा खेळाडू आहेत.’’