वाळूज महानगरात दंगाकाबू पथकाचा सराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:06 AM2021-01-03T04:06:36+5:302021-01-03T04:06:36+5:30
वाळूज महानगर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही अनुचित घटना घडल्यास तात्काळ परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने शनिवारी ...
वाळूज महानगर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही अनुचित घटना घडल्यास तात्काळ परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने शनिवारी (दि.२) माॅक ड्रील करण्यात आले.
पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे-पाटील, सहायक आयुक्त विवेक सराफ, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, वाहतूक शाखेचे निरीक्षक जनार्दन साळुंके आदींच्या प्रमुख उपस्थितीत वडगावच्या पोलीस चौकी हद्दीत शनिवारी सायंकाळी दंगाकाबू पथकाने सराव केला. काही अप्रिय घटना घडल्यास पोलिसांनी परिस्थितीवर कसे नियंत्रण मिळवावे, यासंदर्भात उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपायुक्त खाटमोडे-पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी दंगाकाबू पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वडगाव-बजाजनगरात शस्त्रासह दंगाकाबूसंदर्भात कसून सराव केला. यावेळी वाळूज एमआयडीसी, दौलताबाद, छावणी, वाळूज वाहतूक शाखा, गुन्हे शाखा, तसेच परिमंडळ १ विभागातील सर्व पीसीआर व्हॅन, तसेच संबंधित पोलीस ठाण्यातील बीट मार्शलचे अंमलदार व अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते.
फोटो ओळ- वाळूज महानगरात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दंगाकाबू पथकाने सराव केला.
फोटो क्रमांक-सराव १/२
-------------------------