‘विश्वजीत’च्या गाण्यांनी घातली सखींना भुरळ

By Admin | Published: March 20, 2016 12:29 AM2016-03-20T00:29:59+5:302016-03-20T00:42:54+5:30

जालना : विश्वजीतचा सुरेल आवाज. तेवढीच मदमस्त अंदाजातील जुन्या गाण्यांवरील अदाकारी अन् सखींमधील उल्हास

Practices made by Vishwajit's songs | ‘विश्वजीत’च्या गाण्यांनी घातली सखींना भुरळ

‘विश्वजीत’च्या गाण्यांनी घातली सखींना भुरळ

googlenewsNext


जालना : विश्वजीतचा सुरेल आवाज. तेवढीच मदमस्त अंदाजातील जुन्या गाण्यांवरील अदाकारी अन् सखींमधील उल्हास आणि जोश या सर्वांनी धुमशान जोमात सखी जल्लोष २०१६ या कार्यक्रमाचा सखींनी मनमुराद आनंद लुटला.
लोकमत सखी मंच आयोजित आणि एक्सपर्ट बार प्रायोजित सखी जल्लोष २०१६ हा कार्यक्रम शनिवारी शहरात घेण्यात आला. कार्यक्रमाला झी सारेगमपचा ‘महागायक’ विश्वजीत बोरवणकर याची उपस्थिती हे प्रमुख आकर्षण होत. सोबत या कार्यक्रमात नाशिक येथील डिव्हाईन ग्रुपने दिलखेचक अदाकारीच्या जुन्या गाण्यांवर म्हणजेच भारतीय सिनेमाच्या सुवर्ण युगाला जीवंत करणारी नृत्य सादर केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच विश्वजीत बोरवणकर याने ‘देवा श्रीगणेशा आणि आई भवानी’ सारखी गिते सादर करुन केली. त्यानंतर डिव्हाईन डान्स ग्रुपकडून ‘पिया तोरे नैना लागे वे, प्यारबिन चैन कहा रे, झुमका गिरा रे’ तसेच ‘झुठ बोले कौआ काटे’ या गाण्यांवर नृत्य सादर केले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक रघुनंदन लाहोटी, कोहिनूर शॉपीचे पीयूष सचदेव, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी राजेश भिसे, शाखा व्यवस्थापक मोहित पवार, संदीप देऊळगावकर, वितरणचे किशोर मरकड उपस्थित होते.

Web Title: Practices made by Vishwajit's songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.