औरंगाबादच्या प्रदीप जगदाळेच्या स्फोटक खेळीने मुंबईचा ग्लास पॉलिश इंडिया संघ अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 12:42 AM2018-02-04T00:42:29+5:302018-02-04T00:44:21+5:30

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत औरंगाबादचा शैलीदार फलंदाज प्रदीप जगदाळे याच्या स्फोटक खेळीच्या ...

 Pradeep Jagdale's Aurangabad explosive knock helped Mumbai's Glass Polish India Team Ajinkya | औरंगाबादच्या प्रदीप जगदाळेच्या स्फोटक खेळीने मुंबईचा ग्लास पॉलिश इंडिया संघ अजिंक्य

औरंगाबादच्या प्रदीप जगदाळेच्या स्फोटक खेळीने मुंबईचा ग्लास पॉलिश इंडिया संघ अजिंक्य

googlenewsNext
ठळक मुद्दे स्पर्धेतील मानकरी सामनावीर - प्रदीप जगदाळे गोलंदाज - अक्षय दरेकर फलंदाज - रोहित राणे मालिकावीर : मानसिंग निगडे

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत औरंगाबादचा शैलीदार फलंदाज प्रदीप जगदाळे याच्या स्फोटक खेळीच्या बळावर मुंबईच्या ग्लास पॉलिश इंडिया संघाने सहारा मुंबई संघावर दणदणीत विजय मिळविताना अजिंक्यपद पटकावले.
अझर अन्सारी याच्या ३२ चेंडूंतील ५ चौकार व २ षटकारांसह फटकावलेल्या ५५ धावांच्या बळावर सहारा मुंबईने २० षटकांत ८ बाद १३८ धावा फटकावल्या. त्याच्याशिवाय राहुल देसाईने १९ धावा केल्या. ग्लास पॉलिश इंडियातर्फे सुशांत खैरे याने १४ धावांत ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात औरंगाबादचा डावखुरा शैलीदार फलंदाज प्रदीप जगदाळेच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर ग्लास पॉलिश इंडिया संघाने विजयी लक्ष्य १७.३ षटकांत ६ गडी गमावून १३९ धावा करून पूर्ण केले. त्यांच्याकडून प्रदीप जगदाळे याने तब्बल ८ षटकार व ६ चौकारांसह ६२ चेंडूंतच नाबाद ९६ धावांची वादळी खेळी केली. कर्णधार रोहित राणे १३ धावांवर बाद झाला. सहारा मुंबईकडून मानसिंग निगडे, अक्षय दरेकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
प्रदीप जगदाळेने रणजीपटू समद फल्ला, अझर अन्सारी, भारतीय अ संघाचे प्रतिनिधित्व करणाºया अक्षय दरेकर यांचा विशेष समाचार घेतला. समद फल्लाह याला नेत्रदीपक पूल आणि स्ट्रेट ड्राईव्ह मारणाºया प्रदीप जगदाळे याने अक्षय दरेकर व अझर अन्सारी यांना प्रत्येकी ३ टोलेजंग षटकार ठोकले.
अंतिम सामन्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते विजेत्यांना करंडक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी जया गुदगे, सचिन खैरे, ऋषिकेश खैरे, आशुतोष डंख, गोंडे पाटील, हिरा सलामपुरे, आनंद तांदुळवाडीकर व अ‍ॅड.मयूर यादव उपस्थित होते.

Web Title:  Pradeep Jagdale's Aurangabad explosive knock helped Mumbai's Glass Polish India Team Ajinkya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.