वंचित आघाडीकडून 'आरक्षण बचाव जनयात्रे'ची घोषणा; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम, या आहेत प्रमुख मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 06:44 PM2024-07-16T18:44:03+5:302024-07-16T18:44:53+5:30

"आम्ही पक्षाच्या वतीने, या सामाजिक संघटनांना घेऊन २५ तारखेला दादर चैत्यभूमि येथून सुरूवात करायची. त्याच दिवशी पुण्यात फुलेवाड्याला जायचे आणि २६ तारखेला सकाळी, २६ जूलै एक महत्वाची तारीख आहे. याच दिवशी शाहू माहाराजांनी आरक्षणाची घोषणा केली होती. तेव्हा शाहू महाराजांना नतमस्तक होऊन 'आरक्षण बचाव जनयात्रा' काढण्याचा निर्णय घेतला आहे."

Prakash ambedkar Vanchi bahujan aghadi Announcement of arakshan bachav Janayatra Know the complete program and demands | वंचित आघाडीकडून 'आरक्षण बचाव जनयात्रे'ची घोषणा; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम, या आहेत प्रमुख मागण्या

वंचित आघाडीकडून 'आरक्षण बचाव जनयात्रे'ची घोषणा; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम, या आहेत प्रमुख मागण्या

वचित बहुजन आघाडी जी भूमिका मांडत आहे ती, गावो गावी जायला हवी, अशी काही ओबीसी संघटनांची मागणी होती. त्यामुळे आम्ही पक्षाच्या वतीने, या सामाजिक संघटनांना घेऊन २५ तारखेला दादर चैत्यभूमि येथून सुरूवात करायची. त्याच दिवशी पुण्यात फुलेवाड्याला जायचे आणि २६ तारखेला सकाळी, २६ जूलै एक महत्वाची तारीख आहे. याच दिवशी शाहू माहाराजांनी आरक्षणाची घोषणा केली होती. तेव्हा शाहू महाराजांना नतमस्तक होऊन 'आरक्षण बचाव जनयात्रा' काढण्याचा निर्णय घेतला आहे. ही यात्रा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा, जालना अशी होत सांगता सात अथवा आठ तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये होईल, अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांसोबत बोलत होते. 

अशा आहेत मुख्य मागण्या -
आंबेडकर म्हणाले, "या मार्गावर ठीक-ठिकाणी कॉर्नर बैठका घेतल्या जातील आणि मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या जातील. यातील मुख्य मागण्या म्हणजे, ओबीसींचे आरक्षण वाचायला हवे, एससी-एसटी विद्यार्थांची स्कॉलरशिप दुप्पट व्हावी, केवळ केंद्राचीच स्कॉलरशिप मिळते इतर राज्यांप्रमाणे त्यात राज्य हिस्सा देत नाही. याच बरोबर, ओबीसींच्या विद्यार्थ्यांनादेखील एससी एसटीला जी स्कॉलरशिप मिळते ती जशीच्या तशी लागू व्हायरला हवी, घाई गडबडीत इश्यू करण्यात आलेला फॉर्म ऑफ कास्ट सर्टेफिकेट रद्द करावा, जे कुणबी  आहेत, त्यांना आरक्षण मिळणारच, कारण ते ओबीसीमध्ये सामील आहे. तसेच, आरक्षणात एससी, एसटी बरोबरच ओबीसींनादेखील बदोन्नती मिळायला हवी," असेही आंबेडकर म्हणाले.

राजकीय पक्षांच्या भूमिकेसंदर्भात बोलताना आंबेडकर म्हणाले, "एकीकडे मनोज जरांगे यांनी आपले आंदोलन सुरू केले आहे, तर दुसऱ्याबाजूला जी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्या बैठकीला सर्व मराठा नेते, एनसीपीचे, काँग्रेसचे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातील कुणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे त्या बैठकीत राजकीय पक्षांनी नेमकी भूमिका काय? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीकडून विचारण्यात आला. यावर सामंजस्याचा तोडगा काढायचा असेल, तर येथील श्रीमंत माराठ्यांचे पक्ष जे आहेत, यात एनसीपी, काँग्रेस, बाजप आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, हे जोवर भूमिका मांडत नाहीत. तोवर तोडगा निघत नाही."

"दुसऱ्या बाजूला त्याच बैटकीत वंचितकडून मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली होती की, मुख्यमंत्र्यांनी या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना व्यक्तिगत आणि मुख्यमंत्री म्हणूनही पत्र लिहावे की, जरांगे यांची मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या, ही जी मागणी आहे, या संदर्भात राजकीय पक्षांची भूमिका काय आहे? यासंदर्भात विचारणा करून मग समान तोडगा काय आहे तो काढता येतील. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र वंचितला अद्याप तेस काहीही पत्र मिळाले नाही. इतरांना मिळाले का यासंदर्भात आमच्याकडे माहिती नाही. हा मुद्दा आता केवळ मराठवाड्यापुरताच आहे, असे मी मानत नाही. तर तो पश्चिम महाराष्ट्र आणि खांदेशातही हळू-हळू पसरत चालला आहे," असेही आंबेडकर म्हणाले. 
 

Web Title: Prakash ambedkar Vanchi bahujan aghadi Announcement of arakshan bachav Janayatra Know the complete program and demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.