मनपा उपायुक्तपदी प्रतिभा पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:04 AM2021-06-22T04:04:52+5:302021-06-22T04:04:52+5:30
कामगार शक्ती संघटनेतर्फे धरणे आंदोलन औरंगाबाद : महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागात कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ...
कामगार शक्ती संघटनेतर्फे धरणे आंदोलन
औरंगाबाद : महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागात कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी कामगार शक्ती संघटनेतर्फे मनपा मुख्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. सिडको हडकोत बचत गटामार्फत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. माळी कामगारांचे वेतन महाराणा एजन्सीकडे थकीत आहे. पीएफ, ईएसआयचे चलन कर्मचाऱ्यांना मिळत नाहीत. यांत्रिकीमधील कामगारांचे वेतन थकीत आहे. फवारणी कामगारांच्या वेतनाचा प्रश्नही कायम आहे. रेड्डी कंपनी कामगारांना किमान वेतन देत नाही. यावेळी संस्थापक अध्यक्ष गौतम खरात, भास्कर आढावे, शाम शिरसाठ, राजेंद्र नवगिरे आदी उपस्थित होते.
नव्याने वॉर्ड रचना करण्याची मागणी
औरंगाबाद : मार्च २०२० मध्ये मनपाची निवडणूक घेण्यात येणार होती. कोरोना संसर्गामुळे निवडणुका अगोदर पुढे ढकलण्यात आल्या. नंतर वॉर्ड रचनेचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. भाजपने शहरातील वॉर्डांची रचना आपल्या सोयीनुसार केली होती. भाजपचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावेत, हा या मागचा हेतू होता. समतानगर-कोटला कॉलनी वॉर्डाची रचनाही अशाच पद्धतीने केली आहे. त्यामुळे वॉर्ड रचना पुन्हा नव्याने करावी अशी मागणी माजी नगरसेविका रेश्मा अश्फाक कुरेशी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.