भुकेपेक्षा थोड कमी खाण्यास प्राधान्य द्या; राष्ट्रीय स्थूलता निवारण परिषदेत तज्ज्ञांचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 11:51 AM2018-09-08T11:51:12+5:302018-09-08T11:55:54+5:30
राष्ट्रीय स्थूलता निवारण परिषदेत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी आरोग्या संबंधित अनेक सल्ले दिले.
औरंगाबाद : शहरीकरण आणि यांत्रिकीकरणामुळे मानवाचे शारीरिक श्रम कमी झाले आहेत. परिणामी, भारतीयांमध्ये पोट आणि कमरेभोवती चरबीचे प्रमाण वाढत आहे. २०२५ मध्ये वयाची २५ वर्षे पूर्ण करणारे स्थूलतेच्या समस्येला सामोरे जातील. त्यामुळे भुकेपेक्षा थोडे कमी खावे, ९० मिनिटांनंतर काही वेळ उभे राहावे, ज्यूस पिण्याऐवजी फळे खावीत, भरपूर पाणी प्यावे, असे अनेक सल्ले राष्ट्रीय स्थूलता निवारण परिषदेत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी दिले.
जागतिक स्थूलता फे डरेशन, इंडोक्राईन सोसायटी आॅफ इंडिया, इंडियन मेडिक ल असोसिएशन, औरंगाबाद, फिजिशियन असोसिएशन, औरंगाबाद आणि औरंगाबाद अकॅ डमी आॅफ पिडियाट्रिशयन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीनदिवसीय राष्ट्रीय स्थूलता निवारण परिषदेस शुक्र वारी प्रारंभ झाला. परिषदेच्या पहिल्या दिवशी सर्व शाखांतील डॉक्टरांसाठी क ार्यशाळा झाली. याप्रसंगी जागतिक स्थूलता संस्थेच्या अध्यक्षा प्रो. डोना रेयान, डॉ. क्लॉडिया फॉक्स, अखिल भारतीय स्थूलताविषयक प्रगत संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. बन्सी साबू, पद्मश्री डॉ. शशांक जोशी, अमेरिकेतील डॉ. राजाराम कर्णे, डॉ. हेमंत फ टाले, डॉ. प्रीती फ टाले, डॉ. मनोज चड्ढा आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. क्लॉडिया फॉक्स म्हणाल्या की, मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर अधिकाधिक वेळ घालविला जातो. गरोदरपणात पोटावर चरबी (केंद्रीय स्थूलता) वाढते. त्यामुळे मातेकडून मुलाकडे स्थूलता जाण्याचा धोका असतो. भारतीय लोकांत पोटावरील चरबीचे प्रमाण अधिक आहे.
लक्ष्य ठेवून वजन कमी करा
डॉ. डोना रेयान म्हणाल्या की, भारतीय आणि चिनी लोकांमध्ये पोट आणि कमरेभावती चरबीचे प्रमाण सर्वाधिक आहे. हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. पोटावरील चरबीने हृदयरोग, मधुमेह, यकृत आणि रक्तदाबाचे आजार होतात. त्यामुळे भारतीयांचे आयुष्य घटत आहे. वजन नियंत्रणासाठी आहारात संतुलन राखले पाहिजे. एकाच वेळी पूर्ण वजन कमी करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ५ किलोप्रमाणे वजन कमी करण्याचे लक्ष्य ठेवा.
९० मिनिटांनंतर उभे राहा
डॉ. साबू म्हणाले की, भारतात ४० ते ४५ वर्षांतील ८० टक्के लोकांना पोटावरील चरबीच्या म्हणजे केंद्रीय स्थूलतेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. केंद्रीय स्थूलता झाली की, पुढील १० वर्षांत मधुमेह, हृदयरोगाची लागण होते. सध्याच्या परिस्थितीने २०२५ मध्ये वयाची २५ वर्षे पूर्ण करणारे स्थूलतेच्या समस्येला सामोरे जातील. प्रत्येकाने ९० मिनिटांनंतर काही काळ उभे राहायला हवे. आपण स्थूल आहोत, याचा स्वीकार करून वजन नियंत्रणासाठी प्रयत्न केला पाहिजे.
एका उपकरणामुळे १० किलो वजनवाढ
डॉ. शशांक जोशी म्हणाले की, भारतात उत्पादन वाढविण्यासाठी कीटकनाशके, इंजेक्शनचा वापर केला जातो. त्याला आळा घातला पाहिजे. घरातील एका उपकरणामुळे १० किलो वजनवाढ होते. शरीरासाठी ते अपायकारक ठरते. ताणतणावत अधिक अन्नपदार्थ सेवन केले जाते. त्यातूनही चरबी वाढते. वेळेवर आणि कमी खाल्ले पाहिजे. म्हणजे भुकेपेक्षा थोडे कमी खाणे हे महत्त्वाचे आहे.