गर्भवतींचे रेकॉर्ड अद्ययावत !
By Admin | Published: January 1, 2015 12:08 AM2015-01-01T00:08:45+5:302015-01-02T00:47:39+5:30
बीड : लिंग गुणोत्तर प्रमाणात तळाशी असलेल्या राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये बीड सर्वाधिक डेंजर झोनमध्ये होते. आता स्त्री जन्माचा टक्का वाढला आहे.
बीड : लिंग गुणोत्तर प्रमाणात तळाशी असलेल्या राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये बीड सर्वाधिक डेंजर झोनमध्ये होते. आता स्त्री जन्माचा टक्का वाढला आहे. मात्र भ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रभावी प्रयत्न करण्यावर केंद्र सरकारचा भर आहे. त्यासाठी नव्या वर्षापासून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही नाविण्यपूर्ण मोहीम गतिमान केली जाणार आहे. शिवाय गर्भवतींचे रेकॉर्ड अद्यावत केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बुधवारी दिली.
बुधवारी नववर्षाच्या पूर्वसंध्येला त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते म्हणाले, नुकतीच केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग झाली. यामध्ये त्यांनी बीडमधील लिंग गुणोत्तराचा विशेष आढावा घेत प्रभावी उपाययोजना करण्याचे सुचविले. त्यासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही मोहीम राबविली जाणार आहे. त्या अंतर्गत स्थानिक पातळीवर शाळा, सामाजिक संस्था, महसूल यंत्रणा यांना सोबत घेऊन जनजागृती केली जाणार आहे. शिवाय प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे भ्रूणहत्या रोखण्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज आहे. त्यामुळे जिल्हा स्तरावर टास्क फोर्स नेमून सामाजिक आंदोलन छेडावे लागणार आहे. येणाऱ्या वर्षात स्त्री भ्रूण हत्येचा कलंक पुसून जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण बरोबरीत आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यासाठी संपूर्ण नियोजन झाले असून या मोहिमेला पूरक अशी रूपरेषा आधीच तयार करण्यात आलेली आहे.
बक्षीस देणार
स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये चांगले काम करणाऱ्यांना बक्षीस देऊन गौरविले जाणार आहे. ग्रामपंचायत ते जिल्हास्तरावर एक चळवळ उभी रहावी, अशी योजना आहे, असे जिल्हाधिकारी राम म्हणाले. त्यासाठी पाच जानेवारीपर्यंत नियोजन केले जाईल.
गावनिहाय डाटा
जिल्ह्यात १०२४ ग्रामपंचायती आहेत. महिलांचा सन्मान वाढविण्यासाठी योग्य ते प्रयत्न सुरू आहेत. स्त्री पुरूष लिंग गुणोत्तर प्रमाणाचे रेकॉर्ड अद्यावत केले जाणार आहे. गर्भवती महिलांचे रेकॉर्ड ठेवले जाणार असून त्यासाठीचे नियोजन सात जानेवारीपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. शिरूर कासार तालुक्यात स्त्री जन्माचे प्रमाण सर्वात कमी होते. या तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे, असेही ते म्हणाले.
३०० गावे ‘रेडझोन’मध्ये
स्त्री जन्माची टक्केवारी कमी असलेल्या गावांची संख्या जिल्ह्यात ३०० इतकी आहे. अशा गावांना त्यातून बाहेर काढण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग घेतला जाणार आहे. शिक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, केंद्रप्रमुख, ग्रामसेवक, सरपंच यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. गावांची रेड, ब्राऊन, ग्रीन, ब्ल्यू अशी वर्गवारी केली जाणार असून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही मोहीम यशस्वी करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवार योजनेसाठी गावांची निवड
जलयुक्त शिवार योजनेसाठी प्रत्येक तालुक्यातून दहा गावे निवडली आहेत. आवश्यक तेथे पाणीपुरवठा केला जाणार आहे. दुष्काळी उपाययोजनांसाठी प्रशासन सज्ज असल्याचे राम म्हणाले. (प्रतिनिधी)४
स्त्री भ्रूण हत्येमुळे जिल्ह्यावर केंद्राने यापूर्वीच फोकस केलेला आहे.
४१९९१ मध्ये मुलांच्या तुलनेत मुली जन्माचे प्रमाण जिल्ह्यात ९३९ इतके होते.
४२००१ मध्ये ते ८४९ इतके खाली आले तर २०११ मध्ये केवळ ८०७ झाले.
४त्यामुळे मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यात प्रसुतीपूर्व लिंग निदान चाचणी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी, जनजागृतीवर भर दिलेला आहे. त्यामुळे २०१४ मध्ये स्त्री जन्माचे प्रमाण ८०७ वरून ८५६ इतके वाढले आहे.
४हा टक्का आणखी वाढविण्यासाठी बेटी बचाओ, बेटी पढाओ ही मोहीम प्रभावीपणे राबविली जाणार आहे.
४बीडसह राज्यातील दहा जिल्ह्यात हा कार्यक्रम राबविला जाणार आहे.
४जालना, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, जळगाव आदी जिल्ह्यांचा समावेश आहे.४
जिल्हा बँकेच्या प्रशासक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी राम यांनी बिनशेती व शेतीशी निगडीत असलेल्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रीत केले आहे.
४दुष्काळामुळे शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती आहे. परंतु दहा लाखांवर बाकी असलेल्या शेतकऱ्यांना सवलत दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
४२१४ प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. काही प्रकरणात तडजोडी होत आहेत.
४न्यायालयाची अवहेलना न होता वसुलीवर भर दिला जाणार आहे.