पालकांच्या अतिमहत्त्वाकांक्षेमुळे मुलांना येतेय अकाली प्रौढत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 11:08 AM2019-12-23T11:08:43+5:302019-12-23T11:15:09+5:30

पालकांच्या अतिमहत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आजची मुले आपले बालपण विसरले आहेत.

Premature adulthood comes to children because of parental ambitions | पालकांच्या अतिमहत्त्वाकांक्षेमुळे मुलांना येतेय अकाली प्रौढत्व

पालकांच्या अतिमहत्त्वाकांक्षेमुळे मुलांना येतेय अकाली प्रौढत्व

googlenewsNext
ठळक मुद्देमुलांना मोकळा श्वास किंवा स्वयंनिर्णय घेऊ देत नाहीत, अशा पालकांना ‘हेलिकॉप्टर पालक’ असे म्हणतात.काही पालक तर मुलांना फक्त आदेश व सतत उपदेश करीत असतात, अशा पालकांना ‘मिलिटरी मॅन पालक’ असे म्हटले जातेमुलांना निर्णय घेण्यास सूट देतात. अडचणीतून मार्ग कसा काढायचा, याचीही माहिती देतात, असे ‘समुपदेशक पालक’ म्हणून ओळखले जातात.

औरंगाबाद : धकाधकीच्या जीवनात नोकरीच्या ताणतणावात पालकांना आपल्या मुलांकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाही. पालकांच्या अतिमहत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आजची मुले आपले बालपण विसरले आहेत. अकाली प्रौढत्व आल्यासारखे मुले वागत आहेत, अशी चिंता मानसशास्त्रज्ञ गरिमा आचलिया यांनी व्यक्त केली. 

सीए संघटना व सीए महिला समितीच्या वतीने आयोजित दोनदिवसीय महिला सीए परिषदेची रविवारी सांगता झाली. यानिमित्त ‘मुलांचे संगोपन आणि पालकत्व’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. पालकांच्या जिद्दी आणि हट्टी स्वभावाचे शास्त्रीय पद्धतीने त्यांनी विश्लेषण केले. व्यासपीठावर सीए संघटनेचे अध्यक्ष रोहन आचलिया, रूपाली बोथरा, गणेश भालेराव, सपना लुनावत, ऐश्वर्या ब्रह्मेचा, डॉ. मनसुख आचलिया, डॉ. रश्मीन आचलिया यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पालकांचे प्रकार सांगताना गरिमा आचलिया म्हणाल्या की, आजचे पालक आपला पाल्य सुरक्षित असावा या भावनेतून आपल्या मुलांना कोणतेही धाडस करू देत नाही. सतत त्यांच्या अवतीभोवती फिरत असतात. त्यांना मोकळा श्वास किंवा स्वयंनिर्णय घेऊ देत नाहीत, अशा पालकांना ‘हेलिकॉप्टर पालक’ असे म्हणतात. काही पालक तर मुलांना फक्त आदेश व सतत उपदेश करीत असतात, अशा पालकांना ‘मिलिटरी मॅन पालक’ असे म्हटले जाते, तर काही पालक असे असतात की, ते आपल्या मुलांना निर्णय घेण्यास सूट देतात. निर्णय कसा घ्यावा, त्याचे परिणाम काय होतील, त्यातून मार्ग कसा काढायचा, याचीही माहिती देतात, असे   ‘समुपदेशक पालक’ म्हणून ओळखले जातात. यापैकी तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता, असा प्रश्न यावेळी आचलिया यांनी विचारला. ठराविक वेळेतच मुलांच्या हाती मोबाईल द्या, अशीही सूचना त्यांनी दिली. परिषद यशस्वीतेसाठी सीए संघटना व सीए महिला समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

बालपणीच्या खेळात सारे रमले 
या परिषदेत किरण वाधवाणी यांनी ‘बालपणीचे खेळ’ घेतले. विस्मरणात गेलेले खेळ पुन्हा खेळल्यामुळे सीए महिलांना लहानपणीचे दिवस आठवले. संगीत खुर्चीमध्ये तर सर्व महिला सहभागी झाल्या होत्या. सर्व महिलांनी विविध खेळाचा आनंद लुटला. या खेळांनीच या परिषदेची सांगता झाली. 

Web Title: Premature adulthood comes to children because of parental ambitions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.