‘कृती आराखडा तयार करणार’
By Admin | Published: June 1, 2014 12:19 AM2014-06-01T00:19:02+5:302014-06-01T00:29:22+5:30
भोकरदन: मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी कृती आराखडा तयार करणार असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी दिली.
भोकरदन: मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी कृती आराखडा तयार करणार असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी दिली. तालुक्यास दानवे यांच्या रूपाने पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यामुळे त्यांचा शनिवारी सर्वपक्षीय सत्कार सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अर्चना चिने या होत्या. व्यासपीठावर माजी आ़ संतोषराव दसपुते, रामेश्वरचे चेअरमन संतोष दानवे, निर्मलाताई दानवे, ज्ञानेश्वर माऊली, शिवाजीराव थोटे, राजेंद्र देशमुख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुकेश चिने, शफीकखॉ पठाण, कैलास पुंगळे, अशोकराव कोकाटे, भूषण शर्मा, अनिल देशपांडे, डॉ. के.एन. राजपूत, डॉ. थोरात, डॉ. चंद्रकांत साबळे उपस्थित होते़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याची मिळालेली संधी म्हणजे आपल्या भागातील जनतेचा सन्मान आहे. आपल्या भागाचा कायापालट करण्यासाठी या संधीचे सोने करू असे आश्वासन देत दानवे म्हणाले की, मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. ३५ वर्षांच्या राजकारणात संघर्ष करावा लागला. जनतेने विधानसभेपाठोपाठ लोकसभेत जाण्याची ४ वेळा संधी दिली. जनतेचे आपल्यावरचे प्रेम व विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. आता निधी मिळण्यासाठी काही अडचण येणार नाही, असा आशावादही प्रकट केला. माजी आ़ दसपुते म्हणाले की, दानवे यांच्या रूपाने पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिपद मिळाले. ही अभिमानाची गोष्ट आहे. निवडणुकीत आम्ही एकमेकांच्या विरोधात होतो, ती पक्षीय बाब होती. मात्र, आता ते सर्वांचेच झाले आहेत. उपनगरअध्यक्ष पठाण यांनी आपण राजकीय विरोधक असलो तरीही अडचण आली नाही. अल्पसंख्याक समाज दानवे यांच्याच पाठीशी राहील, असे म्हटले. मुकेश चिने यांनी प्रस्ताविक केले़ यावेळी कमलाकर सांबळे, भास्करराव दानवे, अरूण वाघ, लक्ष्मण मळेकर, गणेशराव रोकडे, कैलास गव्हाड, तुकाराम जाधव, आत्माराम सुरडकर, अंकुश जाधव, भगवान खाकरे, गणेशराव वराडे, बालाजी औटी, सुधाकर दानवे, महेश आकात, शिवराम कड, मुकेश पांडे, भानुदास सरोदे, ज्ञानेश्वर पुंगळे, मधुकर दानवे, इरफान पठाण, फसीभाई मिर्झा, आयुब बेग, सामाधान शेरकर,रमेश मुरकुटे, सुधाकर दानवे, मधुकर तांबडे, गणेश सिंघल, कौतीकराव जगताप, रमेश पांडे, विनोद मिरकर, डी़ व्ही़ दळवी,वाजेद शहा, राहुल ठाकुर, सुरेश शर्मा, गजानन वाघ, सुभाष पाटील,प्रभाकर सांबळे, गजानन तांदुळजे, रमेश बिरसोने, पंढरीनाथ खरात, मोहन हिवरकर, हुकुमसिंह चुडावत किरण मोरे, विठ्ठलराव ढवळे, रमेश पवार, नारायण सांबळे, माधवराव हिवाळे, भगवान सांबळे, संजय खरात, नानासाहब हिवाळे, गणेश ठाले,राजेद्र धोंगडे, जयेश प्रशाद, किरण देशपांडे, विजय कड, शांताराम गव्हाणे, उबाळे, शौकत अली, राजेश जोशी, संजय लोखडे, रावसाहेब कोरडे, शिवा चोपडे, ज्ञानेश्वर तळेकर, नारायण तळेकर, ईरफान पठाण, संजय पारख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा वाघ यांनी केले़ (वार्ताहर) हत्तीवरून मिरवणूक शनिवारी दुपारी दानवे यांच्या निवासस्थानापासून हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण होते. मिरवणुकीदरम्यान महिलांनी ठिकठिकाणी दानवे यांचे औक्षण केले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यामुळे शहरात दिवाळीच साजरी होताना दिसत होती. फटाक्याची आतषबाजी, गुलालाची उधळण, रस्त्यांवर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. पाच ठिकाणी लाडू व पेढेतुला दानवे यांच्या सत्काराच्या निमित्ताने मुकेश पांडे व रमेश पांडे यांच्या वतीने तसेच नवे भोकरदन येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ लाडूतुला करण्यात आली. भाजपा व शिवसेनेच्या वतीने शिवाजी चौकात, शोभाताई मतकर यांच्या निवास्थानाजवळ, जयेश प्रसाद यांच्या वतीने पेढेतुला करण्यात आली.