धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:38 AM2017-09-29T00:38:09+5:302017-09-29T00:38:09+5:30

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त बुद्धलेणीच्या पायथ्याशी दहा देशांतील बौद्ध भिक्खू येणार असून, धम्मदेसना देणार आहेत.

 Preparation for dhamma chakra pravartan day | धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाची तयारी

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाची तयारी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त बुद्धलेणीच्या पायथ्याशी दहा देशांतील बौद्ध भिक्खू येणार असून, धम्मदेसना देणार आहेत. याठिकाणी जाहीर धम्मदीक्षेचा कार्यक्रम होणार असून, अहमदनगर आणि कोलकाता येथील जोडप्यांना धम्मदीक्षा देण्यात येणार आहे. यावेळी आंतरजातीय विवाहित जोडप्यांचाही सत्कार होणार आहे.
मराठवाड्यातील लाखो बौद्ध उपासक- उपासिका बुद्धलेणीवर उपस्थित राहून धम्मदेसनेचा लाभ घेणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा, बुद्ध, धम्म, संघ हे त्रिरत्न बौद्धबांधवांना समजावून सांगितले जाणार आहेत. बुद्ध व भीमगीतांतून समाज प्रबोधनदेखील केले जाणार आहे.
पुस्तकाची दुकाने जास्त...
बुद्धलेणीवर बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीच्या साहित्याची विविध पुस्तके विक्रीला येतात. लेणीवरून घरी जाताना उपासक एक तरी पुस्तक खरेदी करतो. महोत्सवाच्या कार्यकारी अध्यक्षपदी वसंतराव सातदिवे (निवृत्त मुद्रांक जिल्हाधिकारी) यांची निवड करण्यात आली आहे.
शिवाजीनगरात कार्यक्रम...
धम्मक्रांती बुद्ध विहार येथे गजानन गजभिये यांचे व्याख्यान होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक राजेंद्र जंजाळ, कैलास गायकवाड यांची उपस्थिती राहणार आहे, असे राजू भिवसने, काशीद, पी. के. बनसोडे, पी. एन. परतवाघ यांंनी कळविले.
लोकुत्तरा महाविहार, चौका
चौका येथील लोकुत्तरा महाविहारात ६१ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळ्याचे आयोजन ३० सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. पू. भदन्त बोधीपालो महाथेरो धम्म देसना व प्रवचनातून प्रबोधन करणार आहेत. सकाळी १०.३० वाजता पू. भदन्त सुगतबोधी थेरो यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण होईल. २२ प्रतिज्ञांचे वाचन करून धम्मदीक्षेचा कार्यक्रम होणार असल्याचे लोकुत्तरा चॅरिटेबल मिशनचे महासचिव भदन्त काश्यप थेरो यांनी कळविले आहे.

Web Title:  Preparation for dhamma chakra pravartan day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.