परतवारी एकादशीची तयारी अंतिम टप्यात
By Admin | Published: July 17, 2017 12:13 AM2017-07-17T00:13:49+5:302017-07-17T00:33:40+5:30
नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी हे गाव संत नामदेव महाराजाचे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध आहे. येथे २० जुलै रोजी होणारा परतवारी सोहळा सर्वांचे आकर्षण ठरणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी हे गाव संत नामदेव महाराजाचे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध आहे. येथे २० जुलै रोजी होणारा परतवारी सोहळा सर्वांचे आकर्षण ठरणार आहे. या निमित्ताने येथे संत नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी ५ ते ६ लाख भाविक येतात.
नर्सी येथे महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा तर काही भाविक बाहेर देशातूनही येतात. आषाढी वारीला पंढरपूरला जाणारा प्रत्येक वारकरी एकादशीला नर्सी येथे संत नामदेव महाराजाचे दर्शन घेतो तेव्हाच त्यांची पंढरपूर वारी पूर्ण होते, अशी भाविकांची भावना आहे. त्यामुळेच या वारीला परतवारी म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी एकादशीच्या पुर्व संध्येला विदर्भ, मराठवाडा आदी ठिकाणावरुन भाविक मुक्कामी येतात. परतवारी सोहळ्याची सांगता हभप दादाराव महाराज कऱ्हाळे काल्याच्या कीर्तनाने होते. या ठिकाणी येणाऱ्या भाविक, भक्तांची राहण्याची व फराळाची व्यवस्था परिसरातील मंडळी ग्रामस्थांच्यावतीने व नामदेव संस्थान, दानशूर मंडळीतर्फे करण्यात आली आहे. शिवाय येथे परतवारीनिमित्त काकडा भजन, नामदेव महाराज गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, हरिजागर इ. धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.तसेच येथे येणाऱ्या भाविकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्रा. आ. केंद्रात पथक तयार केले आहे. यात डॉ. सोनवणे, डॉ. हरण, रायबोले, गायकवाड, पठाण यांची नियुक्ती केली आहे.