शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांची तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:21 AM2017-08-27T00:21:34+5:302017-08-27T00:21:34+5:30

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या यावर्षी प्रथमच आॅनलाईन पद्धतीने होत असून साडेआठ हजार शिक्षकांच्या बदल्यांची तयारी पूर्ण झाली आहे़ शासन ते मुख्य कार्यकारी अधिकारी या स्तरावर बदल्या होणार असल्याने अधिकारी व पदाधिकाºयांचा हस्तक्षेप आता थांबला आहे़

 Preparation for teacher transfers online | शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांची तयारी पूर्ण

शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांची तयारी पूर्ण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या यावर्षी प्रथमच आॅनलाईन पद्धतीने होत असून साडेआठ हजार शिक्षकांच्या बदल्यांची तयारी पूर्ण झाली आहे़ शासन ते मुख्य कार्यकारी अधिकारी या स्तरावर बदल्या होणार असल्याने अधिकारी व पदाधिकाºयांचा हस्तक्षेप आता थांबला आहे़
जि़ प़ शिक्षकांच्या बदल्या १५ मे पासून सुरू झाल्या होत्या़ जिल्ह्यातील १८१ अवघड क्षेत्र घोषित झाले होते़ मात्र पुन्हा अवघड क्षेत्रांची यादी तयार करण्यात आली़ त्यावर आक्षेप आल्याने अवघड क्षेत्रातील शाळांची पुन:तपासणी गटविकास अधिकाºयांनी केली़ त्यानंतर २१५ गावे अवघड क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले़ अवघड क्षेत्रातील शाळांची अंतिम यादी तसेच सेवाज्येष्ठता शिक्षकांची यादी तयार केल्यानंतर अंतिम यादी तयार करण्यात आली़
२० जूननंतरच शिक्षकांच्या बदल्यांची आॅनलाईन प्रक्रिया सुरू होणार होती, परंतु त्यानंतर अनेक तांत्रिक अडचणींमुळे शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया मंदावली होती़ जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची संख्या ७ हजार ७५८ असून पदवीधर शिक्षकांची संख्या ७५० आहे़ मुख्याध्यापकांची संख्या ५४३ आहे़ प्राथमिक शिक्षकांच्या सवंर्ग १, २ व ३ याप्रमाणे बदल्या होणार आहेत़ त्यामध्ये पती- पत्नी एकत्रिकरण, आजारी, सर्वसाधारण याप्रमाणे सर्व बदलीपात्र शिक्षकांची माहिती पोर्टलवर तयार करण्यात आली आहे़ सदरील माहिती शासनाच्या सूचनेनुसार येत्या तीन, चार दिवसांत आॅनलाईन पाठविण्यात येणार आहे़ त्यानंतर रिक्त जागेनुसार बदल्यांचे आदेश शासनाकडून थेट मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पाठविण्यात येतील़ त्यामुळे शिक्षकांना कोणत्याही अधिकारी किंवा पदाधिकाºयांकडे जाण्याची वेळ येणार नाही़ विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ मध्ये पक्षाघाताने आजारी कर्मचारी, अपंग कर्मचारी, ºहदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी, जन्मापासून एकच किडनी असलेले शिक्षक, कर्करोगाने आजारी, आजी, माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी, विधवा, विधवा कर्मचारी, कुमारिका, परित्यक्ता, घटस्फोटित महिला व वयाची ५३ वर्षे पूर्ण केलेले कर्मचारी़
विशेष संवर्ग २ मध्ये पती, पत्नी एकत्रिकरण व १० वर्षे पूर्ण झालेले शिक्षक बदलीसाठी पात्र राहणार आहेत़

Web Title:  Preparation for teacher transfers online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.