घाटीत ८५८ पर्यंत खाटा वाढविण्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:05 AM2021-03-28T04:05:02+5:302021-03-28T04:05:02+5:30
सचखंड एक्स्प्रेस आज उशिरा धावणार औरंगाबाद : नांदेड ते अमृतसर विशेष सचखंड एक्स्प्रेस २८ मार्च रोजी नांदेड येथून नियमित ...
सचखंड एक्स्प्रेस आज उशिरा धावणार
औरंगाबाद : नांदेड ते अमृतसर विशेष सचखंड एक्स्प्रेस २८ मार्च रोजी नांदेड येथून नियमित वेळ सकाळी ९.३० वाजेऐवजी १५० मिनिटे उशिरा म्हणजेच दुपारी १२ वाजता सुटणार आहे. अमृतसर ते नांदेड सचखंड एक्स्प्रेस ही १२ तास उशिराने धावत आहे. त्यामुळे नांदेडहून सुटणारी रेल्वे उशिरा धावणार आहे.
रिक्षांवर जप्तीची कारवाई
औरंगाबाद : कोरोनाच्या अनुषंगाने रिक्षामधून दोन प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी असताना अधिक प्रवासी बसविले जात आहेत. त्यामुळेच आरटीओ कार्यालयाने शहरातील शहागंज भागात रिक्षांची तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत ४० रिक्षांच्या विरोधात कारवाई करण्यात आली, तर २० रिक्षा जप्त करण्यात आल्या.
डिझेलअभावी एसटी बस जागेवरच
औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकाने मागणी करूनही डिझेल घेऊन येणारा टँकर आला नाही. परिणामी, डिझेल नसलेल्या एसटी बसेस जागेवर उभ्या करण्याची वेळ ओढवली. कडक संचारबंदीमुळे प्रवासीसंख्या नसल्याने अनेक फेऱ्या रद्द करण्याची वेळ ‘एसटी’वर ओढवत आहे. त्यात डिझेलचा साठा नसल्यानेही एसटी बसच्या वाहतुकीवर परिणाम झाला.