मातासाहेब देवांजी जन्मोत्सवाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 01:07 AM2017-09-23T01:07:06+5:302017-09-23T01:07:06+5:30
मातासाहेब देवांजी यांच्या ३३६ व्या जन्मोत्सवाच्या तयारीसाठी मुगट परिसरातील ऐतिहासिक धार्मिक स्थळ असलेल्या गुरूद्वारा मातासाहेब देवांजी येथे बुधवारी जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : मातासाहेब देवांजी यांच्या ३३६ व्या जन्मोत्सवाच्या तयारीसाठी मुगट परिसरातील ऐतिहासिक धार्मिक स्थळ असलेल्या गुरूद्वारा मातासाहेब देवांजी येथे बुधवारी जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली़
२ ते ४ आॅक्टोबरदरम्यान मातासाहेब गुरूद्वारा परिसरात भव्य स्वरूपात मातासाहेब देवांजी यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यासाठी विविध प्रस्तावांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आला़ यावेळी जिल्हाधिकारी डोंगरे म्हणाले, गुरूद्वारा मातासाहेब देवांजीसारख्या पवित्र पावन धार्मिक स्थळाची सेवा करण्याची शासनाला संधी लाभत आहे़ माझ्यासोबतच विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी येथे सेवा म्हणून तीन दिवस आपले कर्तव्य चोखपणे बजावणार आहेत़ हा कार्यक्रम भव्य, दिव्य स्वरूपात साजरा व्हावा आणि सर्वधर्मिय भाविकांची उपस्थिती लाभावी, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले़ बैठकीस गुरूद्वारा मातासाहेबचे प्रमुख जत्थेदार संतबाबा प्रेमसिंघजी, गुरूद्वारा लंगरसाहेबचे संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी कारभारी,नायब तहसीलदार संजय सोलणकर, गुरूद्वारा बोर्डाचे प्रभारी अधीक्षक ठाणसिंघ बुंगाई, जि़ प़ सदस्या अरूणा कल्याणे, भीमराव कल्याणे, गुरूद्वारा बोर्डाचे सदस्य राजेंद्रसिंघ पुजारी, गुरमितसिंघ बेदी, मनप्रीतसिंघ कुंजीवाले, जसबीरसिंघ बुंगाई, गुलाबसिंघ असर्जनवाले, गगनदीपसिंघ जहागीरदार, रमेश गांजापूरकर, रवींद्रसिंघ मोदी यांची उपस्थिती होती़ तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.