जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2017 04:16 PM2017-02-15T16:16:14+5:302017-02-15T16:16:14+5:30

सिल्लोड तालुक्यात गुरुवारी रोजी पहिल्या टप्यात जि. प. पंचायत समिती निवडणुक साठी मतदान होत आहे.

Prepare the administration for Zilla Parishad elections | जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत /श्यामकुमार पुरे 

औरंगाबाद, दि. 15 - सिल्लोड तालुक्यात गुरुवारी रोजी पहिल्या टप्यात  जि. प. पंचायत समिती निवडणुक साठी मतदान होत आहे. या अनुषंगाने तालुक्यातील जिल्हा परिषद 8 गट आणि पंचायत समिती १६ गणांच्या निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज  झाले आहे. कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी ठिक ठिकाणी बुथवर पोलीस फोर्स तैनात करण्यात आला आहे. तालुक्यात 25 पोलीस अधिकारी, 298 पोलीस कर्मचारी, 150 होमगार्ड, एसआरपीची कुमक,10 पोलीस निरीक्षक,3 उपविभागीय पोलीस अधिकारी, एक अप्पर पोलीस अधीक्षक ,6 पोलीस निरीक्षक असे तब्बल 493 अधिकारी  कर्मचारी सिल्लोड तालुक्यात ठिक ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.
 
अन्यथा कठोर कार्यवाही
जमाव बंदी कायदा लागू आहे. गैर कायद्यची मंडली जमा करुण कायदा हातात घेऊ नये. मतदान केंद्रावर गर्दी. अरेरावी करू नका. आचार संहितेचे पालन करा. अन्यथा कुणी कितीही मोठा नेता असला तर त्याच्या विरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल. अशी माहिती वजा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे  यांनी दिला आहे.
 
आठ गटात २लाख ९ हजार २०३ मतदार
सिल्लोड तालुक्यातील  अजिंठा,शिवना, उंडणगांव, घाटनांद्रा,पालोद, भराडी, अंधारी, भवन या ८ जिल्हा परिषद गटांसाठी तसेच पंचायत समितीच्या या अजिंठा, हळदा,शिवना, पानवडोद बुद्रुक, उंडणगांव, अंभई, घाटनांद्रा,आमठाना,पालोद,हटटी, भराडी,केऱ्हाळा, अंधारी, बोरगांव सारवाणी,भवन निल्लोड या १६ गणांसाठी मतदान होणार असून यात स्त्रीया ९५ हजार ९४९  व १ लाख १३ हजार २५४ पुरुष असे एकूण  २ लक्ष ९ हजार २०३ मतदार आहे.
 
संवेदनशील गावे 
सिल्लोड तालुक्यात पिंपळगांवपेठ, भराडी, शिवना, आमठाना, उडणगांव, अंभई, घाटनांद्रा, अंधारी, भवन, बोरगांव सारवणी, अजिंठा, वांगीबुद्रक, गोळेगांव बुद्रुक ,के-हा ळा, सिसारखेडा, पळशी, मादनी,  निल्लोड, कायगाव, डोंगरगाव ही 20 गावे संवेदनशील मतदान केंद्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. या गावात विशेष पोलिस फोर्स तैनात करण्यात आला आहे.
या शिवाय 13 झोन पेट्रोलिंग वाहन तालुक्यात पेट्रोलिंग करणार आहे.कुठे ही अनुचित घटना घडल्यास 15 मिनिटांत पोलिस फोर्स दाखल होईल, अशी विशेष व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी दिली.
 
तालुक्यात एक ही गुन्हा नाही 
आचारसंहिता म्हंटले की हमखास आचारसंहिता भांगाचे गुन्हे दाखल होतात परंतु आश्चर्याची बाब म्हणजे सिल्लोड तालुक्यात एकही आचारसंहिता भंग झाल्याचा गुन्हा दाखल झाला नाही. सर्व अलबेल होते की अलबेल दाखवल्या गेले. या बाबत उलट सुलट चर्चा होत आहे..
424 एव्हीएम मशीन
8 जिल्हा परिषद गट व 16 पंचायत समिती साठी 212 मतदान केंद्रावर 424 एव्हीएम मशीन, साहित्य पोहच करण्यासाठी 16 एसटी बस 36 खाजगी वाहन गावा गावात रवाना करण्यात आले आहे. तालुक्यात एकूण २१२ मतदान केंद्र आहे. प्रत्येक केंद्रावर एक कक्ष मतदान अधिकारी,एक एफपीओ,   दोन मतदान अधिकारी, नेमन्यात आले आहे. सर्व केंद्रासाठी १ हजार २०१ कर्मचारी तर क्षेत्रिय १८ अधिकारी नेमण्यात आले आहेत.अशी माहिती  निवडणुक निर्णय अधिकारी हनुमंत अरगुंडे व तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी संतोष गोरड यांनी दिली.
 

Web Title: Prepare the administration for Zilla Parishad elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.