नाथषष्ठी सोहळा सुखद वाटावा, अशी तयारी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:17 AM2018-01-07T00:17:50+5:302018-01-07T00:17:57+5:30

भाविक व वारक-यांना नाथषष्ठी सोहळा सुखद वाटावा, अशी तयारी प्रशासनाने करावी, असे आवाहन नाथषष्ठी पूर्वतयारी बैठकीत नाथ संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. संदीपान भुमरे यांनी केले. येथील नाथमंदिर कीर्तन हॉलमध्ये शनिवारी प्रशासकीय यंत्रणेची बैठक भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

 Prepare for the celebration of Natha Shastra | नाथषष्ठी सोहळा सुखद वाटावा, अशी तयारी करा

नाथषष्ठी सोहळा सुखद वाटावा, अशी तयारी करा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : भाविक व वारक-यांना नाथषष्ठी सोहळा सुखद वाटावा, अशी तयारी प्रशासनाने करावी, असे आवाहन नाथषष्ठी पूर्वतयारी बैठकीत नाथ संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. संदीपान भुमरे यांनी केले. येथील नाथमंदिर कीर्तन हॉलमध्ये शनिवारी प्रशासकीय यंत्रणेची बैठक भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
नाथषष्ठी यात्रेदरम्यान वारकºयांना सोयी -सुविधा देण्यासाठी प्रशासनाने कोणतीही कसर ठेऊ नये, पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था व आरोग्य सेवेस प्राधान्य द्यावे. वारकºयांच्या स्नानासाठी जायकवाडी धरणातून पाणी गोदावरी पात्रात सलग तीन दिवस सोडावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. बैठकीस तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभागप्रमुख उपस्थित होते. ३ मार्च २०१८ रोजी तुकाराम बिजेच्या मुहुर्तावर नाथषष्ठीचा धार्मिक व औपचारीक प्रारंभ होणार आहे. ६, ७ व ८ मार्चदरम्यान ३ दिवस यात्रा भरते. यावेळी किमान १० लाख भाविक, वारकरी नाथदर्शनासाठी येतात. बैठकीत अनेक नागरीकांनी सुचना मांडल्या. यावर संबधित खात्याच्या अधिकाºयांनी उपाययोजनांची माहिती दिली. त्यानुसार नाथ संस्थानच्या वतीने यात्रामैदान व नाथमंदिरात ३५ सी.सी.टि.व्ही. कॅमेरे बसवणार असल्याचे भुमरे यांनी जाहीर केले.
बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, उपविभागीय आधिकारी भाऊसाहेब जाधव, तहसीलदार महेश सावंत, पैठणचे नगराध्यक्ष सूरज लोळगे, नगरसेवक दत्तात्रय गोर्डे, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, पोलीस निरिक्षक चंदन इमले, सा.बां.चे उपअभियंता राजेंद्र बोरकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता चांदेकर, गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी, राज्य उत्पादन शुल्कचे मुजफ्फर काद्री, तालुकाप्रमुख अण्णासाहेब लबडे, शहरप्रमुख प्रकाश वानोळे, सोमनाथ परदेशी, नगरसेवक तुषार पाटील, सोमनाथ परळकर, भुषण कावसनकर, किशोर चौधरी, संतोष तांबे, मुधलवाडीचे सरपंच काकासाहेब बर्वे, पिंपळवाडीचे सरपंच साईनाथ सोलाट, विष्णू मिटकर, सतीश पल्लोड, अमोल नरके, संतोष धापटे, नंदलाल काळे, दादा बारे, नंदू पठाडे , लहु डुकरे , नाथवंशज ह.भ.प. रघुनाथ महाराज गोसावी, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, दिनेश पारिख, व जगन्नाथ जमादार उपस्थित होते.
उत्सव काळात शहर व परिसरातील मांसविक्री बंद ठेवण्यात येणार आहे. जायकवाडी(दक्षिण) येथून पैठणकडे येताना नाथसागर प्रकल्पाचा भिंतीखाली असलेल्या अरुंद पुलाचे कठडे तुटलेले आहेत. त्याची दुरुस्ती करून दिंड्यांसाठी मार्ग सुरक्षित करून दिला जाणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे दगडी धरण सहायक अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.
गेल्या वर्षी विद्युत रहाट पाळण्यांना यात्रा मैदानात परवानगी नाकारण्यात आली होती. या रहाटपाळण्यांना यावेळी परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावर बोलताना पोलीस उपअधीक्षक स्वप्नील राठोड म्हणाले की, महावितरण कंपनी, नगर परिषद व अन्य तांत्रिक विभागाचे रीतसर नाहरकत प्रमाणपत्र असेल तरच पोलीस परवानगी देतील.

Web Title:  Prepare for the celebration of Natha Shastra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.