बीडला सकळ मराठा महासंमेलनाची तयारी
By Admin | Published: November 16, 2014 11:08 PM2014-11-16T23:08:11+5:302014-11-16T23:39:15+5:30
बीड: आठव्या सकळ मराठा महासंमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे़ यावेळी नामवंत वक्ते हजेरी लावणार असल्याची माहिती संस्थापक अर्जुनराव जाहेर पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली़
बीड: आठव्या सकळ मराठा महासंमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे़ यावेळी नामवंत वक्ते हजेरी लावणार असल्याची माहिती संस्थापक अर्जुनराव जाहेर पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली़
२१ ते २३ नोव्हेंबर या दरम्यान सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स परिसरात हा कार्यक्रम होत आहे़ माजी खा़ गोपाळराव पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल़ बद्रीनाथ महाराज तनपूरे, जालन्याच्या माजी जि़प़ अध्यक्षा कीर्ती उढाण, मराठा महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव केशव खटींग यांचे मार्गदर्शन लाभणार आहे़ यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना जिजाऊ पुरस्कार देऊन गौरविले जाईल़ अॅड़ जगन्नाथ औटे, अरविंद जगताप, सुभाष काळे, धर्मराज थोरात, डॉ़ रमेश घोडके, डॉ़ अविनाश काकडे, रामेश्वर चाळक, अॅड़ किसन कदम, साधना परभणे, बलभीम डोके यांचा समावेश आहे़
उच्चशिक्षणासाठी अभ्यासिक वर्ग, तंत्रशिक्षण माहिती, रोजगारविषयक मार्गदर्शन, आधुनिक शेती- तंत्रज्ञान असे विविध उपक्रम आगामी काळात राबविले जातील़, असेही जाहेर पाटील म्हणाले़ संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वागताध्यक्ष बलभीमराव कुटे यांनी केले़ किशोर जगताप, प्राचार्य दिनकर तेलप, भारत गोरे, रामदास जाधव, डॉ़ बळीराम गवते, सुनील माने, महादेव धांडे, गोविंद कदम, अशोक ठाकरे उपस्थित होते़ (प्रतिनिधी)