अभ्यासपूर्वक आराखडा तयार करा- संजीव जयस्वाल
By Admin | Published: July 10, 2014 11:46 PM2014-07-10T23:46:56+5:302014-07-11T00:59:56+5:30
जालना : पाऊस लांबल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाने अभ्यासपूर्वक आराखडा तयार करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आदेश विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज येथे दिले.
जालना : यावर्षी पाऊस लांबल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा पातळीवर प्रशासनाने अभ्यासपूर्वक आराखडा तयार करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आदेश विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज येथे दिले.
जिल्ह्यातील पाणीटंचाई, चारा टंचाई, रोजगार हमी योजना, जलसंधारण आणि महसूल कामाचा विभागीय आयुक्त जैस्वाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, उपविभागीय अधिकारी डॉ. एन.आर. शेळके, मंजुषा मुथा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सध्या पाऊस लांबल्याने पिण्याच्या पाण्यासाठी गेल्यावर्षी प्रमाणे नियोजन करावे लागेल. धरणातून होणारा अवैध पाणी उपसा यावर संबंधित तहसीलदार यांनी कडक कारवाई करावी, तसेच भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी आतापासूनच पाण्याचे स्त्रोत शोधून ठेवावेत व त्याचे नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.