सफारी पार्कचा प्रस्ताव तयार करा
By Admin | Published: May 24, 2016 12:58 AM2016-05-24T00:58:49+5:302016-05-24T01:25:46+5:30
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय मिटमिटा येथे नेण्यासाठी मागील दहा वर्षांपासून मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. सोमवारी विभागीय आयुक्त,
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय मिटमिटा येथे नेण्यासाठी मागील दहा वर्षांपासून मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. सोमवारी विभागीय आयुक्त, मनपा आयुक्तांनी मिटमिटा येथील जागेची पाहणी केली. सफारी पार्क उभारण्यासाठी महापालिकेने त्वरित प्रकल्प अहवाल तयार करून महसूल विभागाकडे सादर करावा, असे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले.
मिटमिटा भागातील गट नं. ३०७ मध्ये असलेल्या शासकीय गायरान जमिनीवर शंभर एकरामध्ये सफारी पार्क उभारण्यासाठी मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. शासकीय जमीन असल्यामुळे नाममात्र दरात मिळावी, अशी मागणी करीत प्रशासनाने प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता. मात्र त्यात महसूल विभागाने खोडा घालत जमीन नाममात्र दरात देण्यास नकार दिला होता. मनपाने जागेची आगाऊ रक्कम म्हणून १० लाख रुपये जिल्हा प्रशासनाकडे जमा केले आहेत. सोमवारी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट व मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी जागेची पाहणी केली. गट नं. ३०७ मध्ये ८५ हेक्टर जागा असून, त्यात दोन स्मशानभूमी आहेत, तर (पान २ वर)