श्रावणासाठी वैद्यनाथ मंदिर सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 08:18 PM2017-07-23T20:18:04+5:302017-07-23T20:18:04+5:30
सोमवारपासून सुरु होत असलेल्या श्रावणमहिन्यात वैद्यनाथ मंदिरात येणा-या भाविकांची संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने सीसीटीव्ही ,खाजगी सुरक्षा व्यवस्था आदी चोख व्यवस्था ठेवली आहे.
>ऑनलाईन लोकमत
बीड / परळी : सोमवारपासून सुरु होत असलेल्या श्रावणमहिन्यात वैद्यनाथ मंदिरात येणा-या भाविकांची संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने सीसीटीव्ही ,खाजगी सुरक्षा व्यवस्था आदी चोख व्यवस्था ठेवली आहे.जोतीर्लिंग क्षेत्र असल्याने श्रावण महिन्यात मंदिरात देशभरातील भाविकांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती असते.
पोलिस प्रशासनाने सीसीटिव्ही कॅमेऱ्यासह विशेष पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेवून खाजगी सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे.प्रशासनाने भाविकांच्या सेवा व सुविधांसाठी तत्पर रहावे असे आवाहन अप्पर पोलिस अधिक्षक अजित बोऱ्हाडे यांनी केले आहे. तसेच वैद्यनाथ देवस्थानने भाविकांच्या सेवेसाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मंदीर प्रशासन भाविकांच्या सुविधांसाठी व स्वागतासाठी सज्ज असल्याचे देवस्थानचे सचिव राजेश देशमुख यांनी सांगितले.
श्रावण महिन्याच्या निमित्ताने द्वादश ज्योतीर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ येथे महिनाभर देशभरातील भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेवून आज वैद्यनाथ मंदीरात प्रशासकीय बैठक घेण्यात आली. या बैठकीस अप्पर पोलिस अधिक्षक अजित बोऱ्हाडे, पोलिस उपाधिक्षक विशाल आनंद, वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख, विश्वस्थ अनिल तांदळे, गुरूप्रसाद देशपांडे, बाबासाहेब देशमुख, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अभिमन्यु केरूरे पोलिस निरिक्षक हेमंत मानकर, उमाकांत कस्तुरे यांची उपस्थिती होती.