चंपाषष्ठीनिमित्त खंडोबा यात्रेची तयारी अंतिम टप्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:24 AM2017-11-23T00:24:59+5:302017-11-23T00:25:26+5:30
सातारा खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त रविवारी गावकरी व मानक-यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली असून, शुक्रवारी चंपाषष्ठीला महाराष्ट्रातून हजारो भाविकांची गर्दी होणार आहे. त्यामुळे बॅरिकेडस् तसेच पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, ग्रामस्थ व मंदिर ट्रस्ट कामाला लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सातारा खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त रविवारी गावकरी व मानक-यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली असून, शुक्रवारी चंपाषष्ठीला महाराष्ट्रातून हजारो भाविकांची गर्दी होणार आहे. त्यामुळे बॅरिकेडस् तसेच पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, ग्रामस्थ व मंदिर ट्रस्ट कामाला लागले आहे.
चंपाषष्ठीची मुख्य यात्रा शुक्रवारी (दि.२४) ला असून, या दिवशी सकाळी आरती व जहागीरदार मानकरी दांडेकर यांच्या वाड्यात पालखीतून मूर्ती जाणार असून, सायंकाळी पुन्हा मूर्ती मंदिरात विराजमान होणार आहे. २७ नोव्हेंबरपर्यंत यात्रेत भाविकांची गर्दी राहणार आहे. मंदिराचे अध्यक्ष साहेबराव पळसकर, सचिव गंगाधर पारखे व अन्य पदाधिकारी, पुजारी धुमाळ, ग्रामस्थ यात्रोत्सव यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. मंदिरावर विद्युत रोषणाईचे काम अंतिम टप्प्यात असून, मंदिर रोषणाईने उजळून निघाले आहे.
वाहनतळाची व्यवस्था
एमआयटीच्या मोकळ्या मैदानात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली असून, भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून ट्रस्टी प्रयत्न करीत आहेत. ग्रामस्थांसाठी आमदार रोडचा वापर करावा, असे सुचविले आहे.
छंदबाजी सांस्कृतिक कार्यक्रम
सातारा परिसरात हिंदू, मुस्लिम एकात्मता पाहावयास मिळते, खंडोबा यात्रा उत्सवात सायंकाळी बहादूर पटेल यांच्या वतीने छंदबाजी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दरवर्षी हा उपक्रम त्यांच्या वतीने चंपाषष्ठीला राबविला जातो. गावकºयांसाठी ही एक पर्वणीच मानली जाते. सातारा परिसराला जत्रेचे स्वरूप आले असून, आकाश पाळणे, विविध खेळणी मुलांसाठी आकर्षण ठरत आहे.