बाजारसावंगीत दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:04 AM2021-05-31T04:04:11+5:302021-05-31T04:04:11+5:30

--- तुर्काबाद खराडी परिसरात पावसाने दाणादाण लिंबेजळगाव : शनिवारी तुर्काबाद खराडी परिसरात जोरदार पावसाचे आगमन केल्याने दाणादाण उडाली आहे. ...

The presence of rain on the second day in the market | बाजारसावंगीत दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी

बाजारसावंगीत दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी

googlenewsNext

---

तुर्काबाद खराडी परिसरात पावसाने दाणादाण

लिंबेजळगाव : शनिवारी तुर्काबाद खराडी परिसरात जोरदार पावसाचे आगमन केल्याने दाणादाण उडाली आहे. महामार्गावरील टपऱ्या, पत्रे व जुनी झाडे उन्मळ‌ून पडली. येसगाव, लिंबेजळगाव परिसरासह दहेगाव बंगला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे शेतकरी शेती मशागतीच्या कामांकडे वळला आहे.

---

गोळेगाव शिवारात मिरची पिकाचे नुकसान

गोळेगाव : शनिवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सध्या पूर्वहंगामी मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांचे ठिबक मल्चिंग पेपर व मिरचीची रोपे वाहून गेली. गोळेगाव खुर्द येथील पाणीपुरवठ्याची विहीर नदीकाठी असल्याने वाहत येणारे गढूळ पाणी त्यात समाविष्ट झाले. वीजपुरवठादेखील खंडित झाला होता.

Web Title: The presence of rain on the second day in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.