चार रस्त्यांचा कायापालट करण्यासाठी डिझाईनचे सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:06 AM2021-03-07T04:06:16+5:302021-03-07T04:06:16+5:30

स्मार्ट सिटीअंतर्गत स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंजचा एक भाग म्हणून शहरातील क्रांती चौक ते गोपाळ टी, पैठण गेट ते गुलमंडी, ...

Presentation of a design to transform four roads | चार रस्त्यांचा कायापालट करण्यासाठी डिझाईनचे सादरीकरण

चार रस्त्यांचा कायापालट करण्यासाठी डिझाईनचे सादरीकरण

googlenewsNext

स्मार्ट सिटीअंतर्गत स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंजचा एक भाग म्हणून शहरातील क्रांती चौक ते गोपाळ टी, पैठण गेट ते गुलमंडी, कॅनॉट सर्कल आणि एमजीएम-प्रियदर्शनी गार्डन रोड प्रायोगिक तत्त्वावर निवडले आहेत. या रस्त्याचा कायापालट करण्यासाठी देशभरातील तज्ज्ञांकडून डिझाईन मागविण्यात आले. यासाठी निवड समिती तयार केली. यात उपायुक्त अपर्णा थेटे, सहायक नगररचना संचालक जयंत खरवडकर, शहरी तज्ज्ञ मयुरा पाटील, गौरी मिराशी, स्हेना नायर, स्नेहा बक्षी यांचा समावेश आहे. या स्पर्धेचा निकाल लवकरच लागणार आहे. उत्कृष्ट डिझाइनप्रमाणे रस्ते करण्यात येणार आहेत.

३४ हजारांचा दंड वसूल

औरंगाबाद : महापालिकेच्या नागरीमित्र पथकाने शुक्रवारी शहरात नागरिकांकडून ३४ हजार रुपये दंड वसूल केला. मास्क न घालणाऱ्या ४९ नागरिकांकडून २४ हजार पाचशे रुपये वसूल करण्यात आले. कॅरिबॅगचा वापर व इतर कारणांसाठी दंड वसूल करण्यात आला आहे.

रेल्वेस्टेशन, विमानतळावर आठ प्रवासी पॉझिटिव्ह

औरंगाबाद : रेल्वेस्टेशनवर शुक्रवारी १४३ प्रवाशांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यातील तब्बल ६ जण शनिवारी पॉझिटिव्ह आढळून आले. त्याचप्रमाणे विमानतळावर ५० प्रवाशांची तपासणी केली होती. त्यातील २ जण पॉझिटिव्ह आढळले. शनिवारी दोन्ही ठिकाणी १८६ प्रवाशांची तपासणी करण्यात आलेली आहे. त्यांचा अहवाल उद्या सकाळी महापालिकेला प्राप्त होईल.

Web Title: Presentation of a design to transform four roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.